आष्टी तालुक्यात पावसाचा कहर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:57+5:302021-09-08T04:39:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यात सर्वत्र पावसाचा कहर सुरूच आहे. तालुक्यात मागील चार दिवसांपासून पडलेल्या पावसाने काही ...

Rains continue in Ashti taluka | आष्टी तालुक्यात पावसाचा कहर सुरूच

आष्टी तालुक्यात पावसाचा कहर सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : तालुक्यात सर्वत्र पावसाचा कहर सुरूच आहे. तालुक्यात मागील चार दिवसांपासून पडलेल्या पावसाने काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. एकाच रात्रीत बेलगाव, निंबोडी, करंजी, कऱ्हेवडगाव, ब्रम्हगाव, देवीनिमगाव, रूटी इमणगाव, बेलगाव, सावरगाव, कांबळी, गहूखेल, उदखेल, बावी, चोभा निमगाव हे सर्व तलाव ओव्हरफ्लो होण्याची पहिलीच घटना आहे.

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून दररोज पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

तालुक्यातील तलाव नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. नदी, ओढ्या काठच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा पिकात पाणी साचले असून सडण्याच्या मार्गावर आहे. तूर व काढणीला आलेल्या बाजरी पिकात पाणी साचले आहे. धामणगाव, कडा, दौलावडगाव या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. साेयाबीन, कापूस,कांदा, तूर आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.

...

कांदा पीक सडण्याच्या मार्गावर

मागील ४ ते ५ दिवसांपासून जोरदार पावसाने काही शेतकऱ्यांचा लागवड केलेला कांदा पीक वाहून गेले आहे. तर कांदा पिकात पाणी साचून ते पिवळे पडत आहे. यावर पावसाने उघडीप न दिल्यास पिके पिवळी पडून हातातून जाण्याच्या मार्गावर आहेत.

-संतोष मुटकुळे, शेतकरी, मांडवा, ता. आष्टी.

070921\img-20210907-wa0324_14.jpg

Web Title: Rains continue in Ashti taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.