पावसाचे थैमान ! पुरात एकजण वाहून गेला; तर ९०० कोंबड्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 05:25 PM2021-09-08T17:25:56+5:302021-09-08T17:28:04+5:30

rain in beed : गोदावरी नदीला पूर आल्याने पाणी कुक्कुटपालन केंद्रात शिरले.

Rainy weather! One was swept away in the flood; 900 hens were slaughtered | पावसाचे थैमान ! पुरात एकजण वाहून गेला; तर ९०० कोंबड्या दगावल्या

पावसाचे थैमान ! पुरात एकजण वाहून गेला; तर ९०० कोंबड्या दगावल्या

googlenewsNext

माजलगाव ( बीड ) : म्हशीला गवत चारा आणण्यासाठी राजेवाडी बंधार्‍यावरून पुनंदगावकडे जाणारा एक ५० वर्षीय इसम तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, बचाव पथकाकडून शोध कार्य सुरू आहे. तर शिंपेटाकळी तेथे गाई तर सादोळयात ९०० कोंबड्या दगावल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ( Rainy weather! One was swept away in the flood; 900 hens were slaughtered) 

बुधवारी सकाळी ७ वाजता तालुक्यातील राजेवाडी येथील सतीश आश्रुबा पोटभरे हे राजेवाडी बंधार्‍यावरून पुनंदगाव कडे आपल्या म्हशीला चारा आणण्यासाठी राजेवाडी बंधार्‍यावरून जात होते. दरम्यान, यावेळी पुराच्या पाण्यामुळे बंधारा तुडुंब भरून वाहत होता. यावेळी पोटभरे यांचा अचानक तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात पडते. पाहता पाहता ते पाण्यात वाहून गेले. तहसीलदार वैशाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांना शोधण्यासाठी एनडीआरएफच्या जवानास पाचारण केले.

हेही वाचा - स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स

दरम्यान, तालुक्यातील सादोळा येथील दिलीप सोळंके यांच्या शेतात कुकुटपालन केंद्र आहे. या ठिकाणी १ हजार २०० कोंबड्या तर ५० शेळया असतात. शेजारीच असलेल्या गोदावरी नदीला पूर आल्याने मंगळवारी रात्री पाणी कुक्कुटपालन केंद्रात शिरले. यात ९०० कोंबड्या दगावल्या. यावेळी तीनशे कोंबड्या व सर्व शेळ्यांना बाहेर काढण्यात यश आल्याने त्या बचावल्या. त्याचबरोबर शिंपे टाकळी येथील पंढरीनाथ कुंडकर यांनी शेतात बांधलेल्या दोन गाई व दोन बैल सिंधफणा नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

हेही वाचा - एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज

Web Title: Rainy weather! One was swept away in the flood; 900 hens were slaughtered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.