सोशल मीडियातून करा 'एचआयव्हीची' जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:18+5:302021-09-09T04:41:18+5:30
बीड : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी एचआयव्ही या आजाराची ...
बीड : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी एचआयव्ही या आजाराची जनजागृती सोशल मीडियातून आरोग्य विभागासह जागृत जनतेनेही करावी, याबाबत आवाहन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिल्या.
जिल्ह्यात एआयव्ही एड्स प्रतिबंध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्य आईसीचा वापर करावा, तसेच जिल्ह्यातील सर्व खासगी, शासकीय संस्थांनाही सक्रिय सहभागी करून घेत कार्यक्रम प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, डॉ. अनुराधा यादव, डाॅ. एन. बी. पटेल, डॉ. जयश्री बांगर, कार्यक्रमाधिकारी साधना गंगावणे, रेवती लाबडे, सुहास कुलकर्णी, एफ. आर. फारोकी, नवनाथ चव्हाण आदींची उपस्थिती होती.