राजापूर वाळूसाठा; उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांचे अक्षम्य दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:18 AM2019-05-03T00:18:22+5:302019-05-03T00:19:36+5:30
गेवराई तालुक्यातील राजापूर, गंगावाडी परिसरात जिल्हाधिकाºयांनी स्वत: कारवाई करत मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केला होता.
बीड : गेवराई तालुक्यातील राजापूर, गंगावाडी परिसरात जिल्हाधिकाºयांनी स्वत: कारवाई करत मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केला होता. या प्रकरणी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी प्रशानातील संबंधीत अधिका-यांची झाडाझडती सुरु केली आहे. बीड उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळेंसह गेवराई तहसीलदार संगीता चव्हाण व इतर संबंधित अधिकाºयांवर कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांत उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
गेवराई तहसीलदार, नायब तहसीलदार, आणि तलवड्याचे मंडळ अधिकारी व राजापूर येथील तलाठी यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू साठा होत असताना प्रशासनाकडून कारवाई का करण्यात आली नाही? तसेच वाळूसाठे व वाहतुकीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर त्यावर कार्यवाही करणे अपेक्षीत असताना संबंधित अधिकाºयांनी कार्यवाही व उपाययोजना का केली नाही, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस संबंधित अधिकाºयांना पाठवली आहे.
गेल्या महिन्यामध्ये राजापूर येथील सातभाई यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निर्देशानुसार स्वत: जिल्हाधिकाºयांनी राजापूर येथील वाळू घाटांवर कारवाई करत २२०० ब्रासपेक्षा अधिक वाळू जप्त करुन बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व गेवराई येथील विश्रामगृह परिसरात जमा केली आहे.
त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू साठे हे स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनास हाताशी धरून केल्याचे स्पष्ट होत होते. त्यामुळे आता जिल्हाधिकाºयांनी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाºयांची झाडाझडतीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. बीडचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, गेवराई तहसीलदार संगीता चव्हाण, नायब तहसीलदार प्रशांत जाधव, तलवाड्याचे मंडळ अधिकारी राजेंद्र माने, राजापूरचे तलाठी डी.ए. आंधळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू साठा व वाहतूक होण्यामागची कारणे काय याचा खुलासा तीन दिवसांत म्हणेज शुक्रवारपर्यंत देणे बंधनकारक आहे. जर खुलासा दिला नाही तर आपणाला काही सांगायचे नाही असे गृहीत धरुन शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांशी साटेलोटे असणाºया महसूल व पोलीस प्रशासनातील बढ्या अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.
बीड शहरात देखील जप्त केला होता वाळूसाठा
मागील वर्षी बीड शहरातील बिंदूसरा नदीपात्रालगतच्या मोकळ््या जागेत शेकडो ब्रास वाळू जप्त केली होती. ही कारवाई तत्कालीन उपविभागीय अधिकारी विकास माने व बीड तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी केली होती.
या प्रकरणी संबंधित जागा मालकांना दंड भरण्याच्या नोटीस तहसीलदारांमार्फत दिल्या होत्या मात्र, उपविभागीय अधिकारी विकास माने यांची बदली झाल्यनंतर या प्रकरणी अर्थपूर्ण संबंधातून कारवाई केली नसल्याची सूत्रांची माहिती आहे.