बीड जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मस्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:08 AM2020-01-25T00:08:42+5:302020-01-25T00:09:29+5:30
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. यावेळी पक्षाने सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदाची धुरा ही राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपावली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी काम पाहिले.
बीड : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. यावेळी पक्षाने सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदाची धुरा ही राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपावली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी काम पाहिले. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, खा.डॉ.प्रीतम मुंडे, आ.सुरेश धस यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
खा. मुंडे म्हणाल्या, जिल्हा हा कायम भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाचा राहिला आहे. स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्ष व कार्य कर्तृत्वाने कार्यकर्ते, भाजपासाठी बालेकिल्ला ठरला आहे. राज्यात व जिल्ह्यात राजकीय परिस्थिती प्रतिकूल असल्याने वेळोवेळी लोकांच्या कामासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. संघर्षाचे नेतृत्व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन एकजुटीने नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे प्रामाणिकपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रमेश आडसकर, विजयकुमार पालसिंगणकर, केशव आंधळे, आदिनाथराव नवले, भिमराव धोंडे, राजाभाऊ मुंडे, रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे, योगिनी थोरात, वैजनाथ मिसाळ, राणा डोईफोडे, अशोक लोढा, विजयकांत मुंडे, भारत काळे, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री मुंडे, सुभाष धस, बीड शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, बीड शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.