कापूस पणनमहासंघाच्या संचालकपदी राजकिशोर मोदी, विष्णुपंत सोळंके यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 06:36 PM2023-12-27T18:36:38+5:302023-12-27T18:37:14+5:30
राजकिशोर मोदी हे गेली तीन दशकापासून सहकार क्षेत्रात विविध माध्यमातून कार्यरत आहेत.
अंबाजोगाई :- महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाची सन २०२३-२४ साठीची निवडणूक नुकतीच पार पडली.यामध्ये पणन महासंघ महाराष्ट्र राज्याच्या संचालक पदी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य राजकिशोर मोदी, तसेच अॅड. विष्णुपंत सोळंके, माजी उपाध्यक्ष कापूस पणन महासंघ यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात झाली आहे.
राजकिशोर मोदी हे गेल्या नऊ वर्ष महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांची पंचवार्षिक मुदत संपल्यानंतर चार वर्ष अॅड. विष्णुपंत सोळंके हे पणन महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून काम पहात होते. या दोन्ही संचालकांच्या बिनविरोध निवडीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयत्न तथा सहकार्य केले.
राजकिशोर मोदी हे गेली तीन दशकापासून सहकार क्षेत्रात विविध माध्यमातून कार्यरत आहेत. अंबाजोगाई नगर परिषद येथे नगरसेवक, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष अशी गेली तीस ते पस्तीस वर्षापासून राजकिशोर मोदी शहरवासीयांची सेवा करत आहेत.तसेच राज्य पातळीवर राज्यातील नगराध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना देखील त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.