अंबाजोगाई नगर परीषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:02+5:302021-02-06T05:04:02+5:30

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. अंबाजोगाई ...

Rajkishore Modi unopposed as Deputy Mayor of Ambajogai Municipal Council | अंबाजोगाई नगर परीषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी बिनविरोध

अंबाजोगाई नगर परीषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी बिनविरोध

googlenewsNext

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी ही निवड प्रक्रिया पार पडली.

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी ५ फेब्रुवारी रोजी नगरपरीषद सभागृहात सर्व सदस्यांची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत काँग्रेसच्या वतीने दोन फॉर्म दाखल करण्यात आले होते. त्यातील नगरसेवक मनोज लखेरा यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस पक्षाचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. अंबाजोगाई नगरपरीषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीतील हे शेवटचे वर्ष आहे. या पंचवार्षिक निवडणुकीनंतर या शेवटच्या वर्षी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल हे पूर्वीच ठरलेले होते. त्यामुळे यावर्षी काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी यांची निवड उपनगराध्यक्ष म्हणून होणार हे निश्चित झाली होते. त्यानुसार शुक्रवारी पालिकेच्या सभाग्रहात झालेल्या बैठकीत २३ नगरसेवकांनी राजकिशोर मोदी यांची उपनगराध्यक्ष निवडीसाठी पाठींबा दिला.

बैठकीस मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी, सभाग्रह अधीक्षक ए.जे.चव्हाण यांची उपस्थिती होती. सध्या राजकिशोर मोदी हे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी मोदी यांनी अंबाजोगाई नगर परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद भूषविले आहे. अंबाजोगाई शहरातील सर्व आठरापगड जाती धर्मातील समाज बांधवांना सोबत घेऊन मोदी हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत.

Web Title: Rajkishore Modi unopposed as Deputy Mayor of Ambajogai Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.