गगराणी हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये राजस्थानी समाजाचा मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:11 PM2017-09-18T12:11:48+5:302017-09-18T12:12:25+5:30
अंबड येथील गोविंद शिवप्रसाद गगराणी या युवकाची काही दिवसांपूर्वी खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी शहरात सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
बीड, दि. 18 : अंबड येथील गोविंद शिवप्रसाद गगराणी या युवकाची काही दिवसांपूर्वी खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी शहरात सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
२६ ऑगस्ट रोजी जालना जिह्यातील अंबड येथे गोविंद गगराणी या तरुणाची खंडणीसाठी हत्या करण्यात आली होती. यात 'यमराज' नावाच्या कुख्यात गुंडांच्या टोळीचा हात होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. याचा दरम्यान, हत्येतील काही आरोपींना अटक करण्यात आली.परंतु; गगराणी कुटुंब आणखीही दहशतीखाली आहे. या मारेकऱ्यांवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्यांनी फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बीड येथे आज सकल राजस्थानी समाज बांधवांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. पेठेतील बालाजी मंदिरापासून शिवाजी चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहंचला.