राजापूर वाळूघाट पुन्हा चर्चेत, ठेकेदाराला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:38 PM2019-07-25T23:38:16+5:302019-07-25T23:38:55+5:30

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवराई तालुक्यातील राजापूर येथील वाळू घाटावर कारवाई केल्यापासून हा घाट चर्चेत आहे. या घाटाचा काही दिवसांपूर्वी फेरलिलाव करण्यात आला आहे.

Rajpur Balghat re-discussed, notice to contractor | राजापूर वाळूघाट पुन्हा चर्चेत, ठेकेदाराला नोटीस

राजापूर वाळूघाट पुन्हा चर्चेत, ठेकेदाराला नोटीस

Next
ठळक मुद्देसंयुक्त कारवाई : पावत्या न देता वाळूच्या गाड्या भरल्या

बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवराई तालुक्यातील राजापूर येथील वाळू घाटावर कारवाई केल्यापासून हा घाट चर्चेत आहे. या घाटाचा काही दिवसांपूर्वी फेरलिलाव करण्यात आला आहे. बुधवारी या घाटाच्या परिसरात परंतु जालना जिल्हा हद्दीतील घनसावंगी व गेवराईच्या तहसीलदारांनी संयुक्त कारवाई केली होती. यामध्ये पावत्या न देता गाडी भरल्याप्रकरणी तसेच अटी व शर्थींचे उल्लंघन केल्यामुळे ठेकेदारास नोटीस बजावण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील राजापूर येथे मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येतो. तसेच अवैधरित्या वाळू वाहतूक देखील केली जाते. याच वाळू घाटावर कारवाई करत मोठ्या प्रमाणात वाळू जप्त करुन जिल्हाधिकारी कार्यालय व इतर ठिकाणी साठवण्यात आली. परंतु राजापूर येथून वाळू चोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मंगळवारी रात्री याच परिसरातून १० ते १२ टिप्पर वाळू घेऊन जाणार होते. याची माहिती गेवाराई तहसीलदार संगीता चव्हाण यांना मिळाली त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी बुधवारी पहाटे कारवाई केली. मात्र, वाळू भरण्यात येत होती ती हद्द जालना जिल्ह्यात येत असल्यामुळे त्या ठिकाणच्या तहसीलदारांना त्यांनी माहिती दिली. त्यानुसार घनसावंगी येथील तहसीलदार शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन १० टिप्पर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. तर बीड हद्दीतील दोन टिप्पर चालकांकडे पावती नसल्यामुळे चव्हाण यांनी ते टिप्पर पोलीस ठाण्यात जमा केले आहेत.
दरम्यान, गुरुवारी ज्यांच्या गाड्यांवर घनसावंगी तहसीलदारांनी कारवाई केली आहे ते सर्व वाहतूकदार जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी तहसीलदार संगीता चव्हाण यांनी इतर जिल्ह्यातील तहसीलदारांना माहिती देऊन ही कारवाई करायला लावणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. तसेच त्यांना या कारवाईसंदर्भात जाब विचारण्याची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
अधिकाºयांमध्ये भीती ?
गेवराई येथील राजापूर येथे यापूर्वी जिल्हाधिकाºयांनी कारवाई केली त्यावेळी देखील काही लोकांनी जप्त केलेल्या वाळूच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच बुधवारी संगीता चव्हाण यांनी कारवाई केली. त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. मात्र, चव्हाण यांच्यासोबत फक्त एक पोलीस कर्मचारी व इतर महसूलचे दोन अधिकारी उपस्थित होते. वाळूविरुद्ध कारवाई करणाºया अधिकाºयांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षा प्रदान करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.

Web Title: Rajpur Balghat re-discussed, notice to contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.