आत्मचेतना रॅलीने राजपूत अधिवेशनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:01 AM2019-08-30T00:01:49+5:302019-08-30T00:03:12+5:30
शहरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या श्री राजपूत करनी सेनेच्या राजपूत महाअधिवेशनाची आत्मचेतना रॅलीने गुरुवारी सांगता झाली. शहरातील कालिका नगर येथून आत्मचेतना रॅलीला प्रारंभ झाला.
बीड : शहरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या श्री राजपूत करनी सेनेच्या राजपूत महाअधिवेशनाची आत्मचेतना रॅलीने गुरुवारी सांगता झाली. शहरातील कालिका नगर येथून आत्मचेतना रॅलीला प्रारंभ झाला. रॅली मार्गावर महापुरुषांच्या पुतळ्यास अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभविादन करण्यात आले. रॅलीत उपाध्यक्ष योगेंद्रसिंग कटार, महिला संघटन मंत्री अॅड. संध्या राजपूत आनंदसिंग ठोक, देविचंद बारवाल, बाबा ठाकूर, सोनल पाटील, शितल राजपूतल जगदीश परदेशी, छाया परदेशी, अर्जुन बहिरवाळ यांच्यासह तेलंगणा, कर्नाटक तसेच महाराष्टसह इतर राज्यातून आलेले प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राजपूत करनी सेनेच्या विविध ठिकाणच्या पदाधिकारी तसेच प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. संध्या राजपूत म्हणाल्या, एकाच कुळातून निर्माण झालेल्या सर्व जाती एक झाल्या तर समाजाला प्रगतीच्या दिशेने जाता येईल. महिलांनी ठरविले तर त्या दोन कुळांचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा उद्धार करु शकतात. स्वत:चा शोध घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आपल्या चुका टाळण्याची गरज आहे. समाज संघटीत झाला तर जग त्याची दखल घेतल्याशिवाय राहात नाही, असे नमूद करत जळगाव येथील व्याख्याते रामचंद्र पाटील यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी म्हणाले, राजकीय पक्ष वोटबॅँक बनविण्यासाठी आरक्षणाचा हत्यारासारखा वापर करत आहेत. आरक्षण हे कॅन्सरप्रमाणे आहे.