रंगनाथ तिवारी यांना राज्य शासनाचा 'महाराष्ट्र भारती' साहित्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 06:59 PM2019-02-21T18:59:25+5:302019-02-21T19:00:25+5:30

पुरस्काराचे वितरण १ मार्च २०१९ रोजी मुंबई येथे होणार आहे.

Ranganath Tiwari has been awarded the Maharashtra Bharti Literary Award by the state government | रंगनाथ तिवारी यांना राज्य शासनाचा 'महाराष्ट्र भारती' साहित्य पुरस्कार जाहीर

रंगनाथ तिवारी यांना राज्य शासनाचा 'महाराष्ट्र भारती' साहित्य पुरस्कार जाहीर

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई येथील प्रख्यात साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या वतीने सन २०२७-१८ या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार'' जाहीर झाला आहे. हिंदी साहित्य क्षेत्रात अतिशय सन्मानाचा समजला जाणाऱ्या  या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह असे आहे. पुरस्काराचे वितरण १ मार्च २०१९ रोजी मुंबई येथे होणार आहे.

प्रा. तिवारी यांनी शहराचा साहित्यिक झेंडा संपूर्ण राज्यात ऊंचावला असल्याच्या भावना व्यक्त करून नगराध्यक्षा रचना मोदी, माजी राज्यमंत्री अँड. पंडीत राव दौंड, राजकिशोर मोदी, आ. प्रा. संगीता ठोंबरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, डॉ. सिध्देश्वर बिराजदार,  सुदर्शन रापतवार, प्रा. नानासाहेब गाठाळ, प्रा. शांतीनाथ बनसोडे आदींनी त्यांचे स्वागत केले. 

Web Title: Ranganath Tiwari has been awarded the Maharashtra Bharti Literary Award by the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.