कुंटणखान्यावर छापा; महिला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:46 PM2019-03-15T23:46:45+5:302019-03-15T23:47:30+5:30

शहरातील लक्ष्मणनगर भागातील एका कुंटणखान्यावर छापा टाकून किसनाबाई साहेबराव पवार (६० लक्ष्मणनगर, बीड) नामक महिलेला ताब्यात घेण्यात आले.

Ransom; Female possession | कुंटणखान्यावर छापा; महिला ताब्यात

कुंटणखान्यावर छापा; महिला ताब्यात

Next

बीड : शहरातील लक्ष्मणनगर भागातील एका कुंटणखान्यावर छापा टाकून किसनाबाई साहेबराव पवार (६० लक्ष्मणनगर, बीड) नामक महिलेला ताब्यात घेण्यात आले. यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व शहर पोलिसांनी ही कारवाई संयुक्तरित्या केली.
किसनाबाई ही राहत्या घरातच कुंटणखाना चालवित होती. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी सायं.६ वाजता अचानक धाड टाकली. यामध्ये तीन महिलांची सुटका केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष पाटील, पोउपनि भारत माने, राणी सानप, प्रताप वाळके, शेख शमिम पाशा, सतीश बहिरवाळ, निलावती खटाणे, सुरेखा उगले, मिना घोडके यांनी केली. बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.

Web Title: Ransom; Female possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.