कुंटणखान्यावर छापा; दोन पीडितांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:07 AM2019-01-23T00:07:14+5:302019-01-23T00:08:52+5:30

पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या आंटीला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Ransom; Two of the victims were released | कुंटणखान्यावर छापा; दोन पीडितांची सुटका

कुंटणखान्यावर छापा; दोन पीडितांची सुटका

Next
ठळक मुद्देआंटी जाळ्यात : शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

बीड : पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या आंटीला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी बीड शहरातील संत कबीर नगर भागात करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुजाता गवळी (३५ रा.बीड) असे पकडलेल्या आंटीचे नाव आहे. बीड शहरातील संत कबीरनगर भागातील भागातील एका खासगी शाळेसमोर निवृत्त शिक्षकाचे घर आहे. या शिक्षकाच्या घरी किरायाने आंटीने एक खोली घेतली होती. सुजाता महिलांना घरी बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांना मिळाली होती. त्यावरुन मंगळवारी दुपारी एका पंटरला सोबत घेऊन पोलसांनी छापा टाकला. पंटरने आंटीच्या हातात तीन हजार टेकवून इशारा करताच पोलीस धडकले. त्यानंतर दोन पीडित महिलांसह आंटीला ताब्यात घेतले. पीडित महिला अंदाजे २१ ते २३ वर्षे वयाच्या असून त्या बीडमधीलच आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. आंटी सुजाता गवळी हिला जेरबंद करण्यात आले असून पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी ढगारे, शेख शंहेशाह, आर. बी. प्रधान, सतीश तरटे, पी. बी. वायभट, एस.एस.सय्यद आदींनी केली.

Web Title: Ransom; Two of the victims were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.