पाहुणा म्हणून आला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला; बदनामीच्या भीतीने आईची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 01:19 PM2023-02-17T13:19:06+5:302023-02-17T13:21:49+5:30

केज तालुक्यातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

rape on minor girl; Mother's suicide due to fear of infamy | पाहुणा म्हणून आला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला; बदनामीच्या भीतीने आईची आत्महत्या

पाहुणा म्हणून आला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला; बदनामीच्या भीतीने आईची आत्महत्या

Next

केज (जि. बीड) : तालुक्यातील एका आदिवासी वस्तीवर आई, वडील बाजाराला गेल्याची संधी साधून पाहुणा म्हणून आलेल्या एकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, या घटनेने बदनामी होईल, या भीतीने मुलीच्या आईनेही मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली.

केज तालुक्यातील एका आदिवासी समाजाच्या वस्तीवर ८ फेब्रुवारी २०२३ रोजी मुलीचे आई, वडील बाजाराला गेल्याची संधी साधून राजेश चंद्रभान शिंदे (रा. नामलगाव) हा घरी आला. घरी एकटीच असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघून गेला. हा प्रकार मुलीने चार दिवसांनी आईला सांगितला. आई, वडील दुसऱ्या गावी त्याच्या नातेवाइकांकडे गेले. तेथून राजेश शिंदे याच्या मोबाइलवर कॉल केला असता त्याचा मामा गणेश काळे (रा. येळंबघाट) याने कॉल घेतला. यावेळी मुलींच्या आईला त्याने धमकी देऊन विनाकारण विषय वाढवू नको. नसता तुझ्या मुलीप्रमाणे तुझ्यावरपण अत्याचार करीन म्हणून धमकी दिली. यामुळे मुलीच्या आईच्या मनावर परिणाम झाला. तिने तणावाखाली येऊन १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक दिलीप गित्ते, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी पार्थिव केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. पीडित मुलीचे वडील व मयत महिलेचा पती यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हणून राजेश चंद्रभान शिंदे याच्याविरुद्ध तर मुलीच्या आईला धमकी दिल्याप्रकरणी गणेश काळे या दोघांविरुद्ध केज पोलिसांत मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. तपास पिंक पथकाच्या प्रमुख महिला पोलिस उपनिरीक्षक सीमाली कोळी ह्या करीत आहेत.

अंबाजोगाई येथे वैद्यकीय तपासणी
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात हजर करण्यात आल्याची माहिती महिला पोलिस उपनिरीक्षक सीमाली कोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: rape on minor girl; Mother's suicide due to fear of infamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.