अत्याचाराच्या जबर मानसिक धक्क्यातून विवाहितेने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:04 PM2020-02-26T14:04:59+5:302020-02-26T14:06:43+5:30

ही घटना परळी तालुक्यातील एका गावात २४ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. 

Rape victim Married women commits suicide due to severe mental trauma | अत्याचाराच्या जबर मानसिक धक्क्यातून विवाहितेने केली आत्महत्या

अत्याचाराच्या जबर मानसिक धक्क्यातून विवाहितेने केली आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देआत्महत्येपूर्वी केला होता पतीला फोन 

बीड/परळी : एका विवाहित महिलेवर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. या अपमानातून सदर विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील एका गावात २४ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. 

संबंधित महिलेचा पती बाहेरगावी राहतो. याचा गैरफायदा घेऊन गावातील राम ऊर्फ माउली लक्ष्मण नवघरे याने २४ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते ११ वा. च्या सुमारास घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. यामुळे सदर विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या फिर्यादीवरून आरोपीविरोधात मंगळवारी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीच्या शोधात पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

आत्महत्येपूर्वी केला होता पतीला फोन 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेने अत्याचारानंतर रात्री पतीला फोन करून यासंदर्भात माहिती दिली होती. तसेच हा मनस्ताप सहन होत नसून आपण आत्महत्या करत असल्याचे देखील पतीला सांगितले होते. त्यानंतर फोन ठेवून विष प्राशन करत विवाहितेने आत्महत्या केली. 

Web Title: Rape victim Married women commits suicide due to severe mental trauma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.