तणनाशकांमुळे दुर्वा झाल्या दुर्मिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:06+5:302021-09-14T04:40:06+5:30
अंबाजोगाई : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मिळ झाले आहे. ...
अंबाजोगाई : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मिळ झाले आहे. ग्रामीण भागातही गणेश भक्तांना दुर्वा म्हणजेच हरळी या वनस्पतीसाठी भटकंती करावी लागत आहे.
पौराणिक कथेनुसार उष्ण, गरळ ओकणारा अनलासूर राक्षसाचा गणेशाने वध केला होता. त्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यामुळे ऋषीमुनींनी गणेशाच्या डोक्यावर दुर्वाची जुडी अर्पण केली अशी अख्यायिका आहे. परंतु, दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. डोळ्यांचे आजार, सोरायसिस, त्वचारोग, बेबी ऑईल, नागीन अशा आजारात या वनस्पतीचा उपयोग होतो. होमिओपॅथी व युनानी या पद्धतींमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. परंतु, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही वनस्पती तण असल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतातील उत्पन्न कमी करते. मजुरांच्या अभावामुळे शेतकरी या वनस्पतीचे तणनाशकाद्वारे निर्मूलन करतात. तग धरून जगण्याची जिद्द या वनस्पतीमध्ये आहे.
हरळी या वनस्पतीचे वनस्पती शास्त्रानुसार सायनाडोन डेक्लोलान नाव आहे. ही वनस्पती जगात सर्वत्र आढळते. हिला पशू आवडीने खातात. परंतु, शेतातील पिकांवर या वनस्पतीमुळे परिणाम होतो. त्यामुळेच शेतकरी तणनाशक वापरून तिचा नाश करतात. त्यामुळे ही वनस्पती दुर्मिळ होत चालली आहे.
- प्रा. एस. पी. कुलकर्णी, अंबाजोगाई.
130921\20210913_094023.jpg
दुर्वा