रासेयो म्हणजे सामाजिक बांधिलकीचे प्रेरणास्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:37 AM2021-09-26T04:37:00+5:302021-09-26T04:37:00+5:30
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ व प्रा. डॉ. ...
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ व प्रा. डॉ. सखाराम वाघमारे उपस्थित होते. डॉ. रणमाळ यांनी रासेयोचे महत्त्व समजून सांगितले. डॉ. वाघमारे यांनी रासेयो म्हणजे सामाजिक बांधिलकीचे प्रेरणास्रोत असल्याचे पटवून दिले. उपप्राचार्य डॉ. मोरे यांनी तंत्रज्ञानामुळे रासेयोचे महत्त्व अधिक वाढत चाललेले आहे, असे मत मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. अमोल गगणे व सूत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन सवने यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बायजा कोटुळे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
250921\img-20210924-wa0006.jpg
घाटनांदूर येथील कामधेनू सेवाभावी संस्था संचलित वसुंधरा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा
योजना दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी उपप्राचार्य प्रा डॉ मोरे,प्रा डॉ गंगणे ,प्रा डॉ वाघमारे,प्रा डॉ रणमाळ आदी .