पिकविम्याच्या मागणीसाठी गेवराईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 02:43 PM2019-07-23T14:43:03+5:302019-07-23T14:48:37+5:30

कंपनीने तलवाडा व जातेगाव परिसरातील शेतकर्‍यांचा सोयाबिनचा विमा नामंजूर केला

Rastaroko of farmers in Gevrai; demand for crop insurance | पिकविम्याच्या मागणीसाठी गेवराईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्तारोको

पिकविम्याच्या मागणीसाठी गेवराईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्तारोको

Next

गेवराई (बीड ) :  तालुक्यातील जातेगाव व तलवाडा महसूल मंडळातील शेतकर्‍यांना सोयाबिनचा विमा नाकारला आहे. विमा कंपनीने भर दुष्काळात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचा विमा नाकारुन शेतकर्‍यांच्या जखमांवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. हा विमा त्वरित मंजुर करून वाटप करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.२३ ) सकाळी 11.30 वाजता जातेगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी या भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते. आंदोलनामुळे  दुर्तफी गाड्याची रांग लागली होती.

तालुक्यातील तलवाडा व जातेगाव महसूल मंडळातील शेतकर्‍यांनी गतवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबिनचा पेरा केला होता. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. परंतू दुष्काळ असून देखील विमा कंपनीने तलवाडा व जातेगाव परिसरातील शेतकर्‍यांचा सोयाबिनचा विमा नामंजूर केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन्ही महसूल मंडळातील सोयाबिन उत्पादकांना तात्काळ विमा रक्कम मंजूर करुन वाटप करावी या मागणीसाठी आज सकाळी 11.30 वाजता जातेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांना देण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, माणिक कदम, निवृत्त शेवाळे, अशोक मुटकुळे, वचिष्ठ बेडके, काशिनाथ चिकणे, सतिष मस्के, लिंबाजी पवार, कैलास पवार, शेख मुसा आदींचा आंदोलनात सहभाग होता. 

Web Title: Rastaroko of farmers in Gevrai; demand for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.