गेवराईत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:39 PM2018-06-20T16:39:35+5:302018-06-20T16:39:35+5:30
गारपीट ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी , बोंडअळीचे अनुदान तात्काळ वाटप करावे यासह अन्य मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेवराई (बीड ) : गारपीट ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी , बोंडअळीचे अनुदान तात्काळ वाटप करावे यासह अन्य मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या आज सकाळी 11 वाजता उमापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मागील काही दिवसांपूर्वी तालुक्यात मोठ्याप्रमाणावर गारपीठ झाली याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, बोंडअळीचे अनुदानही प्रलंबित आहे. तसेच काही ठिकाणी तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या चुकीमुळे कशी शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत त्यांना न्याय द्यावा या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने आज रस्ता रोको करण्यात आला. आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन आहेर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष मनोज आहेर, शंकर औटी, सतोष राऊत, सरपंच महेश आहेर, उपसरपंच रावसाहेब काळे, अजित औटी, रविराज आहेर, लक्ष्मण आहेर, सोपान दळवी, शरद आहेर, अझर इनामदार, शौकत पठान, विष्णू सस्ते , शकिल कुरेशी, अबेद कुरेशी, मारुती जाधव आदींचा सहभाग होता.