'दहशतीत जगण्यापेक्षा मरतो'; अंबाजोगाई न्यायालय परिसरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 02:20 PM2023-08-30T14:20:21+5:302023-08-30T14:20:21+5:30

सतत जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून अंगावर डीझेल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न

'rather die than live in terror'; Attempted self-immolation by youth in Ambajogai court area | 'दहशतीत जगण्यापेक्षा मरतो'; अंबाजोगाई न्यायालय परिसरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

'दहशतीत जगण्यापेक्षा मरतो'; अंबाजोगाई न्यायालय परिसरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

googlenewsNext

अंबाजोगाई -: दहशत व भितीपोटी जगण्यापेक्षा आत्मदहन करण्याचा निर्णय घेऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकास पोलिसांनी रोखले.व पुढील अनर्थ टळला. हा प्रकार बुधवारी सकाळी अंबाजोगाईच्या न्यायालय परिसरात घडला. किशोर सुधाकर झिंजुर्डे (वय ३०, रा. कौठळी, ता. परळी) असे त्या युवकाचे नाव आहे. 

परळी तालुक्यातील कौठळी येथे विहिरीवर पाणी आणण्याच्या कारणातून दि.३१ जुलै २०२१ रोजी  किशोर आणि वडील सुधाकर झिंजुर्डे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सुधाकर झिंजुर्डे यांच्या फिर्यादीवरून संजय वैजेनाथ गित्ते (वय ४२), बाळू वैजेनाथ गित्ते (वय ४३), यांच्यावर दि.९ ऑगस्ट २०२१ रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाले आहेत. मागासवर्गीयांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. नगर जिल्ह्यातील घटना ताजी असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या घटनेचा जातीअंत संघर्ष समितीचे निमंत्रक बब्रुवान पोटभरे यांनी निषेध नोंदवला आहे.

काय म्हटलंय पीडित युवकाने:
दोन वर्षांपासून सदरील युवक भीतीने जगत आहे. त्याला जीवे मारून टाकीन अश्या धमक्या दिल्या जात आहेत. प्रशासन कसल्याही प्रकारची मदत करत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती दिली आहे.

Web Title: 'rather die than live in terror'; Attempted self-immolation by youth in Ambajogai court area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.