जिल्हा उपाध्यक्षपदी रवी मुंजाळ यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:58 AM2021-03-13T04:58:07+5:302021-03-13T04:58:07+5:30

बीड : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रवी मुंजाळ यांची निवड करण्यात आली आहे. पोलीस परिवाराच्या अडचणी सोडविण्यासाठी ...

Ravi Munjal elected as District Vice President | जिल्हा उपाध्यक्षपदी रवी मुंजाळ यांची निवड

जिल्हा उपाध्यक्षपदी रवी मुंजाळ यांची निवड

Next

बीड : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रवी मुंजाळ यांची निवड करण्यात आली आहे. पोलीस परिवाराच्या अडचणी सोडविण्यासाठी ही संघटना कार्यरत असून, संस्थापक-अध्यक्ष राहुल दुबाले यांनी मुंजाळ यांची निवड केली. योगेश कदम, गणेश पवार, पप्पू राठाेड, आनंद मगर, सिध्देश्वर शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डासांचा प्रादुर्भाव, धूर फवारणीची मागणी

बीड : शहरातील कचराकुंड्या व गटारींची नियमित सफाई होत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र धूर फवारणीची मागणी नागरिकांमधून होत आहे. नगरपालिकेने यासंदर्भात तातडीने उपाय करून आरोग्य अबाधित ठेवण्याची मागणी आहे.

मद्यपी चालकांमुळे प्रवाशांना मन:स्ताप

नेकनूर : उदगीरहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसचालकाने मद्यपान केल्याचा संशय आल्यानंतर प्रवाशांनी त्याला नेकनूर स्थानकात रोखले. हे लक्षात येताच चालकाने तेथून पळ काढला. दरम्यान, दोनवेळा अपघात टळले. अखेर प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवणाऱ्यांना तंबी

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम घालून दिलेले आहेत. तसेच रुग्णसंख्या वाढत असल्याने बाजारपेठ निर्धारित वेळेत बंद होत आहे. मात्र, काही ठिकाणी हॉटेल, चहा दुकाने, पान टपऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. अशा ठिकाणी गस्तीवरील पोलिसांकडून तंबी दिली जात आहे.

Web Title: Ravi Munjal elected as District Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.