फाइव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तयार आहात का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:55 AM2019-08-19T00:55:28+5:302019-08-19T00:55:42+5:30
फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी बॅँका तयार आहेत काय? सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकाच्या कामकाजाचे विश्लेषण तसेच सुधारणेसाठी उपाय याबाबत भारत सरकारने तयार केलेल्या प्रणाली अंतर्गत बीडमध्ये भारतीय स्टेट बॅँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी चर्चा सत्राचे आयोजन केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी बॅँका तयार आहेत काय? सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकाच्या कामकाजाचे विश्लेषण तसेच सुधारणेसाठी उपाय याबाबत भारत सरकारने तयार केलेल्या प्रणाली अंतर्गत बीडमध्ये भारतीय स्टेट बॅँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी चर्चा सत्राचे आयोजन केले होते.
या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध क्षेत्रातून प्राप्त माहितीच्या आधारावर अर्थव्यवस्थेमध्ये एमएसई, निर्यात, रिटेल, किरकोळ, कृषी आदी क्षेत्रात कर्ज स्तर वाढविण्यासाठी चर्चा करण्यात आली. फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी सक्षम संसाधने तयार करणे, डिजिटल पेमेंट पद्धती, प्रोद्योगिकी साधनांचा उपयोग वाढविणे या विषयांवर बॅँक अधिकाऱ्यांनी चर्चा केली.
या चर्चासत्रात बॅँक व्यवस्थेला जनकेंद्रीत बनविणे, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, लघु उद्योजक, उद्योजक, व्यावसायिक, युवा वर्ग, विद्यार्थी, महिला तसेच सर्व हितधारकांच्या अपेक्षा आणि गरेजनुसार त्याला अनुकूल करण्याविषयी चर्चा करण्यात आली. मुलभूत सुविधा, व कर्ज सहायता, शेती, हरित अर्थव्यवस्था, स्वच्छ भारत, वित्तीय समावेशन, महिला सशक्तीकरण, प्रत्यक्ष लाभ अंतरण, डिजिटल अर्थव्यवस्था, रोख रकमेचा कमी वापर, राहणीमानात सहजपणा व कार्पोरेट सामाजिक दायित्व यावर बॅँकांनी केलेल्या कार्याचे विश्लेषण करण्यात आले. तसेच राष्टÑीय उद्देशांच्या प्राधान्यानुसार व गरजांबद्दल साधक-बाधक सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये जिल्हाभरातील एसबीआयच्या ४८ शाखांचे व्यवस्थापक सहभागी झाले ोते.
बॉटम टू टॉप अभ्यासानंतर ठरणार पुढील दिशा
या चर्चेतून सार्वजनिक क्षेत्रातील बॅँका विशेषत: भारतीय स्टेट बॅँकेला अधिक उत्कृष्ट बनविण्यासाठी व भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी आवश्यक नवीन सूचना, सुधारणांबाबतही चर्चेत सहभागी अधिकाऱ्यांनी मत मांडले.
चर्चासत्रातून आलेला गोषवारा एकत्रित करुन राज्य स्तरावरील बॅँकर्स समितीच्या परिमंडळ कार्यालयास पाठविण्यात आला. यात शाखानिहाय तुलनात्मक कामकाजाची व रचनेची माहिती देण्यात आली.
राज्य स्तरावरील बॅँकर्स समितीमध्ये चर्चा झाल्यानंतर याची अंतीम स्वरुपातील चर्चा राष्टÑीय स्तरावर होऊन बॅँकांकडून प्राप्त शिफारशी, सूचनांच्या आधारावर पुढील दिशा ठरविली जाणार आहे.