आपेगाव सेंटरमधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:40+5:302021-06-09T04:41:40+5:30
अंबाजोगाई : शनिवारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटी देणाऱ्या डॉक्टरांचा आपेगाव येथील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांचा ...
अंबाजोगाई : शनिवारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटी देणाऱ्या डॉक्टरांचा आपेगाव येथील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांचा किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव, युवक नेते राहुल सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते.
मागील काही दिवसांपासून आपेगाव येथे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूपच मोलाचा ठरला आहे. त्यांच्यामुळे अनेक रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकले,त्यांचे ऋण कदापि विसरता येणारे नाहीत. अशा शब्दांत देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोविड योद्धे याकामी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्याबद्दल आपेगाव कोविड केअर सेंटरमधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. यावेळी किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव, युवक नेते राहुल सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, अंबाड, प्रतापराव मोरे, राजाभाऊ देशमुख, बळीराजे वाघमारे, आश्रुबा करडे यांच्यासह डॉ. भारत नागरे, डॉ. अजय ठोंबरे, डॉ. धनेश्वर मेनकुदळे, डॉ. व्यंकट बेंबडे, डॉ. फड, डॉ. गायत्री ढमाले, परिचारिका कावरे, ढाकणे, कराड, देशमुख, मुंडे, जगदाळे, शिंदे तसेच कर्मचारी अशोक राऊत, बालाजी वाघमारे, रवी सरवदे, अजित बनसोडे यांचीही उपस्थिती होती.
डॉ. अजय ठोंबरे हे म्हणाले, डॉक्टर म्हणून धीर देत रुग्णांवर केलेले उपचार व प्रबोधनामुळे रुग्ण उपचारास प्रतिसाद देतो. हसत खेळत व आनंदी वातावरणात उपचार करण्यात आल्याने हे कोविड सेंटर रुग्णांना ‘हॅप्पी होम’ वाटते असे ते म्हणालेण तर वेळेवर योग्य ती खबरदारी घेतल्यानंतर कोरोना १०० टक्के बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता योग्य औषधोपचार घ्यावेत, असे डॉ. भारत नागरे हे म्हणाले.
या कार्यक्रमात डॉ. भारत नागरे, डॉ.अजय ठोंबरे, डॉ. धनेश्वर मेनकुदळे, डॉ.व्यंकट बेंबडे, डॉ. नरसिंग फड यांचा राजेसाहेब देशमुख, ॲड. माधव जाधव, राहुल सोनवणे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी
येथील गायक सुभाष शेप व गायिका मयुरी यांनी देशभक्तीपर,भजन, छत्रपती शिवरायांवर आधारित गीत, शेतकरी गीत, गारवा आणि निसर्गराजा आदी एकापेक्षा एक सरस, सुरेल व बहारदार गीते सादर करून कोरोना बाधित रुग्णांना आपल्यासोबत ठेका धरायला लावला.
===Photopath===
070621\07bed_2_07062021_14.jpg