निर्मिती अनुभवातून सेंद्रिय काकडीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:30+5:302021-05-06T04:35:30+5:30

अंबाजोगाई : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत, अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयात निर्मिती अनुभव शिक्षण उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सेंद्रिय काकडीचे ...

Record production of organic cucumber from production experience | निर्मिती अनुभवातून सेंद्रिय काकडीचे विक्रमी उत्पादन

निर्मिती अनुभवातून सेंद्रिय काकडीचे विक्रमी उत्पादन

Next

अंबाजोगाई : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत, अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयात निर्मिती अनुभव शिक्षण उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सेंद्रिय काकडीचे विक्रमी उत्पादन घेतले, तर दुग्धजन्य पदार्थांचीही निर्मिती केली.

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या निर्देशानुसार विविध शैक्षणिक व शिक्षणपूरक उपक्रम राबवले जातात.

महाविद्यालयातील विद्यार्थी भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे प्रात्यक्षिक स्वतः करतात व या उत्पादनाची विक्रीही विद्यार्थीच करतात. त्यातून त्यांना प्रत्यक्ष उत्पादन, विक्री, व्यवहारज्ञानाचा अनुभव मिळतो. त्याच अनुषंगाने कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ‘अनुभवातून शिक्षण’ या संकल्पनेतून पशुसंवर्धन विभागाचे मोड्यूल प्रभारी डॉ. नरेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुग्धजन्य पदार्थाचे (खवा, पनीर) यांचे उत्पादन घेऊन विक्री केली. तसेच उद्यानविद्या शाखेचे डॉ. अरुण कदम व डाॅ. बसवलिंगआप्पा कलालबंडी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सेंद्रिय काकडीचे भरघोस व विक्रमी उत्पादन घेतले. त्याची विक्रीही विद्यार्थ्यांनीच शासकीय कोविड नियमांचे पालन करून महाविद्यालयाजवळच्या वसाहतीत जाऊन २० रुपये प्रति किलो दराने केली.

काकडी लागवड ते उत्पादन या कालावधीत डॉ. नरेंद्र काळे, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ कुलकर्णी, पं. उद्धव बापू अपेगावकर, राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे आदी मान्यवरांनी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. संतोष बोबडे, संतोष केंद्रे, देविदास जाधव यांनी प्रकल्पास भेट देऊन विद्यार्थ्याकडून काकडी खरेदी केली व त्यांना प्रोत्साहित केले. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. अरुण कदम व डाॅ. प्रताप नाळवंडीकर उपस्थित होते. काकडी लागवड, तंत्रज्ञान व उत्पादन घेण्यासाठी, दत्ता मुजमुले, पीयूष पंचभाई, गणेश लहूडकर, शुभम हेळमकर, ऋषिकेश बादाडे, अक्षता जाधव, श्रद्धा राठोड, पल्लवी खैरे, वैष्णवी मेंगडे, अमृता शेगडे, ज्ञानेश्वरी झोल, शुभांगी गवळी व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थी नवउद्योजक व्हावेत

सोयाबीन, रब्बी ज्वारी या बीजोत्पादनाबरोबरच विविध जातींचे आंबे व विविध जातींच्या चिंचांचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले आहे. कृषीचे विद्यार्थी भविष्यात कुशल नवउद्योजक तयार व्हावेत व त्यातून त्यांच्या अंगी स्वावलंबन यावे हा उद्देश या उपक्रमातून साध्य होत असल्याचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले.

===Photopath===

050521\avinash mudegaonkar_img-20210505-wa0026_14.jpg

Web Title: Record production of organic cucumber from production experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.