विक्रमी नेत्रशिबीर; १४ हजार डोळे तपासले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:53 AM2019-08-19T00:53:01+5:302019-08-19T00:53:25+5:30
आ.विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून रविवारी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बीड तालुक्यासह जिल्हाभरातून डोळ््याची तपासणी करण्यासाठी नागरिक आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आ.विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून रविवारी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बीड तालुक्यासह जिल्हाभरातून डोळ््याची तपासणी करण्यासाठी नागरिक आले होते. या शिबीरात पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व डॉ.रागिणी पारीख यांनी स्वत: रुग्णांची तपासणी केली. यावेळी ६ हजार ९३२ जणांची मोफत तपासणी करण्यात आली, तर ९५२ जणांच्या डोळ््याची शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे आ. विनायक मेटे यांनी यावेळी सांगितले.
शहरातील माँ वैष्णो पॅलेस येथे आयोजित शिबिरासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पद्मश्री डॉ. लहाने यांनी त्यांच्या वाहनात बसेपर्यंत रुग्णांची तपासणी केली. आ विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात कित्येकांना नवी दृष्टी मिळणार आहे. यावेळी या शिबिरास जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला यामध्ये ६९३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर शिवसंग्रामच्या वतीने ३ हजार ७१९ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
शिबिरात तपासणीनंतर ९५२ रुग्णांची शस्रक्रिया आवश्यक असल्याने त्यांची मोफत शस्त्रक्रिया मुंबई येथे जे.जे रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे आ.विनायक मेटे यांनी सांगितले. यावेळी आ. विनायक मेटे, पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने, डॉ. रागिणी पारेख, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे, सुनील क्षीरसागर, वसंत मुंडे, गंगाधर काळकुटे, सुहास पाटील, रामहरी मेटे, संतोष सोहणी, यांच्यासह शिवसंग्राम पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.