पीएम किसानच्या बोगस लाभार्थ्यांकडून आठ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:50+5:302021-03-26T04:33:50+5:30
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेणे अपेक्षित असताना पती आणि पत्नी यांच्यासह मुलांच्या नावे ही या योजनेचा ...
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेणे अपेक्षित असताना पती आणि पत्नी यांच्यासह मुलांच्या नावे ही या योजनेचा लाभ घेण्यात येत होता त्यामुळे वरील सर्वांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्याकडून पीएम किसान योजनेचा घेतलेला लाभ वसूल केला जात आहे.महसूल प्रशासनाच्या सांगण्यानुसार यापुढे पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाच व्यक्तीस कायदेशीररीत्या पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे.तर पती किंवा पत्नीच्या पश्चात दुसऱ्या व्यक्तीस वारसा पत्राने त्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळे यापुढे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, तर कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला या लाभावर पाणी सोडावे लागणार आहे.
आता पर्यंत आठ लाख रुपयांची वसुली
आयकर भरणाऱ्या तसेच एका कुटुंबात अनेक जण पी. एम. किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्वांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे.त्यापैकी काही शेतकऱ्यांनी आठ लक्ष रुपयांपर्यंत निधी परतावा केला आहे. कुटुंबात पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाचस या योजनेचा लाभ घेता येतो.सर्वांनी महसूल प्रशासनास सहकार्य करत शासनाची फसवणूक करून उचललेला पैसा तात्काळ जमा करावा अन्यथा पुढे होणाऱ्या कारवाईस ते स्वतः जबाबदार असतील असे नायब तहसीलदार प्रकाश गोपड यांनी सांगितले.