नातेवाईकांची रुग्णालयामध्ये पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:33 AM2021-04-27T04:33:23+5:302021-04-27T04:33:23+5:30
... निष्काळजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी अंबाजोगाई : ग्राहक जरी मास्क वापरत असले तरी अनेक फळे व भाजी विक्रेते अद्यापही ...
...
निष्काळजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
अंबाजोगाई : ग्राहक जरी मास्क वापरत असले तरी अनेक फळे व भाजी विक्रेते अद्यापही मास्कचा वापर टाळत आहेत. अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशा स्थितीत या विक्रेत्यांना मास्क वापरणे सक्तीचे करावे. अन्यथा प्रादुर्भाव वाढीस लागेल. अशी भीती निर्माण झाली आहे.
...
कांदा दरात झाली घसरण, शेतकरी संकटात
अंबाजोगाई : अंबाजोगाई व परिसरातील बाजारपेठेत नवीन उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर आला आहे. मात्र या कांद्याला पाहिजे तसा दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे. आता शेतकऱ्यांचा कांदा निघत असल्याने दरात अचानकच मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
,..
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा. राडी ते मुडेगाव अशा अनेक रस्त्यावर पडलेल्या त्या खड्ड्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे.
....
फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे
अंबाजोगाई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडण्यास मुभा दिली आहे. मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.