नातेवाईकांची रुग्णालयामध्ये पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:35 AM2021-04-28T04:35:56+5:302021-04-28T04:35:56+5:30

निष्काळजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी अंबाजोगाई : ग्राहक जरी मास्क वापरत असले तरी अनेक फळ व भाजी विक्रेते अद्यापही मास्कचा ...

Relatives piped to the hospital | नातेवाईकांची रुग्णालयामध्ये पायपीट

नातेवाईकांची रुग्णालयामध्ये पायपीट

Next

निष्काळजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

अंबाजोगाई : ग्राहक जरी मास्क वापरत असले तरी अनेक फळ व भाजी विक्रेते अद्यापही मास्कचा वापर टाळत आहेत. अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशा स्थितीत या विक्रेत्यांना मास्क वापरणे सक्तीचे करावे. अन्यथा प्रादुर्भाव वाढीस लागेल, अशी भीती निर्माण झाली आहे.

कांदा दरात झाली घसरण

अंबाजोगाई : अंबाजोगाई व परिसरातील बाजारपेठेत नवीन उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर आला आहे. मात्र, या कांद्याला पाहिजे तसा दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. आता शेतकऱ्यांचा कांदा निघत असल्याने दरात अचानकच मोठी घसरण होत बारा ते वीस रुपयांवर भाव आले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, राडी ते मुडेगाव अशा अनेक रस्त्यांवर पडलेल्या त्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे.

फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे

अंबाजोगाई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडण्यास मुभा दिली आहे. मात्र, या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे.

Web Title: Relatives piped to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.