अंबाजोगाईत २३० खाटांच्या इमारतीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:41 AM2017-12-25T00:41:24+5:302017-12-25T00:42:04+5:30

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील २३० खाटाची शल्यचिकित्सालयीन बी विंग, शुश्रृषागृह व नूतन क्षयरोग कक्ष तसेच धर्मशाळा इमारात नूतन वास्तूंचा लोकार्पण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

Release of 230 cottage buildings in Ambajogai | अंबाजोगाईत २३० खाटांच्या इमारतीचे लोकार्पण

अंबाजोगाईत २३० खाटांच्या इमारतीचे लोकार्पण

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टरांचा सन्मान जपण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील २३० खाटाची शल्यचिकित्सालयीन बी विंग, शुश्रृषागृह व नूतन क्षयरोग कक्ष तसेच धर्मशाळा इमारात नूतन वास्तूंचा लोकार्पण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्र मास आ. संगीता ठोंबरे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा रचना मोदी, रमेश आडसकर, गयाबाई आव्हाड, नेताजी देशमुख, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, सा. बां. अधीक्षक अभियंता कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष रु ईकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शासन अनेक योजना राबवित असून, प्रत्येक रुग्णांना डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांनी चांगली सेवा देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिध्देश्वर बिराजदार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश जाधव, डॉ. योगेश गालफाडे, डॉ. शैलेश वैद्य, डॉ. प्रशांत हिपरगेकर, डॉ. नितीन चाटे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

रुग्णांची सेवा करताना डॉक्टर आपला जीव धोक्यात घालत असतात असे अनेक आजार असून बºयाचदा अज्ञानातून डॉक्टरांबद्दल गैरसमज होतात. सेवाभावी वृत्तीमुळे भारतातील वैद्यकीय सेवेचा समावेश जगातील सर्वोत्कृष्ट सेवांमध्ये होतो, जनतेने आपल्या दु:खांवर फुंकर घालणाºया डॉक्टरांचा सन्मान जपणं ही काळाची गरज आहे. आजही वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या डॉक्टरांची संख्या जास्तच असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.

एमबीबीएसच्या ५० जागा वाचवण्यासाठी खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल आनंद व्यक्त करुन पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, स्वाराती रुग्णालयासाठी सातत्याने पाठपुरावा करुन करोडो रुपयांचा निधी उपलब्ध केला. मेडीकल कॉलेज प्रशासनाला रुग्णसेवेसाठी सदैव पाठिंबा असल्याचे सांगून स्वाराती रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Release of 230 cottage buildings in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.