पर्यावरण शुद्धतेसाठी वसुंधरा प्लॅस्टिक मुक्त करा : दत्ता पत्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:01 AM2021-02-06T05:01:53+5:302021-02-06T05:01:53+5:30

जनशिक्षण संस्थान बीडद्वारा आयोजित गेवराई येथील केंद्रावरील प्रशिक्षणार्थींसाठी जीवन समृद्धात्मक शिक्षणातील 'पर्यावरण' या विषयावर मार्गदर्शन करत होते. पत्की म्हणाले, ...

Release Vasundhara Plastics for Environmental Cleanliness: Datta Patki | पर्यावरण शुद्धतेसाठी वसुंधरा प्लॅस्टिक मुक्त करा : दत्ता पत्की

पर्यावरण शुद्धतेसाठी वसुंधरा प्लॅस्टिक मुक्त करा : दत्ता पत्की

Next

जनशिक्षण संस्थान बीडद्वारा आयोजित गेवराई येथील केंद्रावरील प्रशिक्षणार्थींसाठी जीवन समृद्धात्मक शिक्षणातील 'पर्यावरण' या विषयावर मार्गदर्शन करत होते.

पत्की म्हणाले, आपल्या घरात विविध वस्तूंच्या पॅकिंगच्या प्लॅस्टिकचे आवरण असतात. त्यांना जर मिनरल वाॅटरच्या एक लिटरच्या बॉटलमध्ये भरवले व त्या बॉटलचा वापर इको ब्रिक म्हणून केला तर आपण त्या बॉटलमध्ये शंभर चौरस फूट प्लॅस्टिक भरून ठेवू शकतो. पर्यायाने तेवढ्या प्लॅस्टिकचे प्रदूषण थांबू शकतो. भविष्यात पर्यावरण शुद्ध हवे असेल तर वसुंधरा प्लॅस्टिकमुक्त करा, असे आवाहन त्यांनी केले. उपस्थित प्रशिक्षणार्थींना त्यांच्या हस्ते प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जन शिक्षण संस्थांचे संचालक गंगाधर देशमुख होते. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भांडवल गुंतवणूक करून व्यवसाय करावा व हे भांडवल प्रधानमंत्री मुद्रा लोन, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या माध्यमातून कसे उपलब्ध करता येते याविषयी माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रम अधिकारी सीमा मनोरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षिका, रुक्मिणी गायकवाड व गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रशिक्षणातील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.

Web Title: Release Vasundhara Plastics for Environmental Cleanliness: Datta Patki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.