बारा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:25 AM2018-12-17T00:25:19+5:302018-12-17T00:26:59+5:30
तालुक्यातील नंदनज येथे वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘पाणी व्यवस्थापन - संवर्धन’ या संकल्पनेवर सात दिवसीय युवक-युवती शिबीर पार पडले. श्रमदानातून दोन डोंगरी शेततळी तयार केली. वन्यप्राणी, पशु, पक्ष्यांसाठी हे जलकुंभ अर्पित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यातील नंदनज येथे वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘पाणी व्यवस्थापन - संवर्धन’ या संकल्पनेवर सात दिवसीय युवक-युवती शिबीर पार पडले. श्रमदानातून दोन डोंगरी शेततळी तयार केली. वन्यप्राणी, पशु, पक्ष्यांसाठी हे जलकुंभ अर्पित केले.
यावेळी दत्ताप्पा ईटके, एनएसएस जिल्हा समन्वयक डॉ. सोपान सुरवसे, उपाध्यक्ष डॉ.दे.घ.मुंडे, डॉ.हरिश्चंद्र वंगे, सरपंच अनिल गुट्टे यांची उपस्थिती होती. या उपक्रमात बाळासाहेब कडबाने, धीरज जंगले, धनजंय आढाव, मोहन व्हावळे, उपप्राचार्य डॉ.जगदीश जगतकर, प्रा.डॉ.डी.व्ही. मेश्राम, प्रा. डी. के. आंधळे, प्रा. गया नागोराव, प्रा. वीरश्री आर्या, प्रा. नारायण पाळवदे, ग्रंथपाल शंकर धांडे, प्रा.योगेश रेड्डी, प्रा.एन. एस. जाधव, प्रा.बी.एस. सातपुते, प्रा.टी.ए. गित्ते आदींनी सहभाग घेतला. आयोजन प्रा.डॉ. माधव रोडे यांनी केले. त्यांना अंबिका रामदासी, कमलाकर गुट्टे, विवेक आघाव, विश्वजीत आंधळे, वैष्णवी कुलकर्णी, रिशा वानखेडे, अश्विनी फड, प्रतीक्षा कराड, सुनील गुट्टे, दीपक गुट्टे, जुबेर सय्यद, एजाज पठाण, उमेश लहाने, राजू जाधव यांनी सहकार्य केले. शिबिरात प्रा.रोडे यांनी युवकांना मोबाईल,फेसबुक, व्हॉटस्अॅप विसरुन श्रमसंस्कार, जलसंस्कार, माणुसकीची गाणे शिकवली, लोकसंवाद शिकवला यात ७५ युवक, ५५ युवती, २० ग्रामस्थांचा सहभाग घेतला.