रुग्णसंख्या घटल्याने दिलासा; पण मृत्यूसत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:32 AM2021-05-15T04:32:44+5:302021-05-15T04:32:44+5:30

बीड : जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. आठवडाभरातील पाॅझिटिव्हिटी रेटही ३९वरून २४वर आला आहे. ...

Relief from declining patient numbers; But death will not stop | रुग्णसंख्या घटल्याने दिलासा; पण मृत्यूसत्र थांबेना

रुग्णसंख्या घटल्याने दिलासा; पण मृत्यूसत्र थांबेना

googlenewsNext

बीड : जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. आठवडाभरातील पाॅझिटिव्हिटी रेटही ३९वरून २४वर आला आहे. नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासन करीत असलेल्या नियोजनाची यशाकडे वाटचाल होत असल्याचे दिसते. असे असले तरी मृत्यूसत्र थांबत नसल्याचे जिल्हावासीयांची चिंता कायम आहे. आरोग्य विभागाला उपचारात आणखी गती द्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. एका दिवसांत दीड हजार नव्या रुग्णांचा टप्पाही ओलांडला होता. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ३९वर गेला होता. परंतु मागील आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ७ मे रोजी पॉझिटिव्हिटी रेट हा ३३ होता, तर मागील चार दिवसांपासून २५च्या खाली आल्याने दिलासा मिळाला आहे. चाचण्यांची संख्या मात्र दररोज चार हजारांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. ही रुग्णसंख्या घटत असल्याची बाब जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास कोरोनाची चेन तोडण्यात जिल्ह्याला लवकरच यश येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. कोराेनाचे नियम पाळण्यासह काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आठवड्यात दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त

रुग्णसंख्या घटण्याबरोबरच आठवडाभरात कोराेनामुक्तीचा टक्काही वाढला आहे. ७ मेपासून शुक्रवारपर्यंत नऊ हजार ७६९ नवे रुग्ण आढळले असून, १० हजार ३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हीच बाब दिलासा देणारी आहे.

मृत्यू राेखण्याचे आव्हान कायम

जिल्ह्यात ७ मेपासून शुक्रवारपर्यंत ३४६ मृत्यूची नोंद आयसीएमआर पोर्टलवर झाली आहे. यातील १५२ मृत्यू हे जुने अपडेट केले असून, १९४ मृत्यू हे आठवड्यातील आहेत. हीच बाब चिंताजनक आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी बाधितांना आधार देणे, वेळेवर व दर्जेदार उपचार करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

३५ हजार कोनोना चाचणी

जिल्ह्यात आठवडाभरात चाचण्यांची संख्याही दररोज चार हजारांच्यावर आहे. आठवड्यात ३५ हजार १५८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. पैकी नऊ हजार ७६९ रुग्ण बाधित आढळले असून, २५ हजार ३८९ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोट

आठवड्यापासून काही प्रमाणात नवे रुग्ण आढळण्याची संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु अद्याप धोका टळलेला नाही. मृत्यू रोखण्यासह रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पूर्ण नियोजन केले जात आहे. आठवड्यातील रुग्णसंख्या घटली म्हणून नागरिकांनी गाफील राहू नये. कोरोना नियम पाळण्यासह काळजी घ्यावी. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

डॉ.आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

तारीख

चाचण्या

बाधित रुग्ण

पॉझिटिव्हिटी रेट

कोरोनामुक्त रुग्ण

मृत्युसंख्या

७ मे

४०२४

१३६२

३३.८५

१३०८

१८

८ मे

४२७१

१२६३

२९.५७

१३५९

१३

९ मे

४२३६

१२८५

३०.२६

१३४४

३५

१० मे

४४८०

१२५५

२८.०१

१२१७

७९

११ मे

४२८८

१३०४

३०.४१

११८३

४६

१२ मे

४२८३

१०३५

२४.१७

१३१४

८५

१३ मे

४७८३

११५३

२४.११

१३१७

४८

१४ मे

४७८३

१११२

२३.२४

१२८८

२२

Web Title: Relief from declining patient numbers; But death will not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.