आरोग्य विभागाला दिलासा; एका टीएचओसह २० एमओ रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:44+5:302021-07-15T04:23:44+5:30

बीड : जिल्हा आरोग्य विभागात डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत धारूरच्या एका तालुका आरोग्याधिकाऱ्यासह विविध आरोग्य ...

Relief to the health department; Apply 20 MO with one THO | आरोग्य विभागाला दिलासा; एका टीएचओसह २० एमओ रुजू

आरोग्य विभागाला दिलासा; एका टीएचओसह २० एमओ रुजू

Next

बीड : जिल्हा आरोग्य विभागात डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत धारूरच्या एका तालुका आरोग्याधिकाऱ्यासह विविध आरोग्य केंद्रांत २० वैद्यकीय अधिकारी रुजू झाले आहेत. त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे सांगण्यात आले आहे. या नवख्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिक व तत्पर कर्तव्य बजावल्यास सामान्यांना लाभ मिळणार आहे.

जिल्ह्यात आष्टी, माजलगाव व धारूर तालुक्यांना आरोग्याधिकारी नव्हते. या तीनही ठिकाणी आता अधिकाऱ्यांची नियुक्ती आदेश निघालेले आहेत. असे असले तरी आतापर्यंत केवळ धारूरचे तालुका आरोग्याधिकारी रुजू झाले असून आष्टी व माजलगावचे अधिकारी अद्यापही रुजू झालेले नाहीत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही नियुक्ती दिलेली आहे. आतापर्यंत २० डॉक्टर रुजू झाल्याची नोंद आरोग्य विभागात झाली आहे. या सर्वांनी आरोग्य केंद्रात जाऊन कारभार हाती घेतल्याचे सांगण्यात आले. या नवख्या अधिकाऱ्यांमुळे काही प्रमाणात आहे त्या डॉक्टरांवरील ताण कमी झाला आहे. तसेच सामान्यांनाही उपचारांसाठी लाभ होणार आहे. या सर्वांकडून सामान्यांसह अधिकाऱ्यांना चांगल्या कामाची अपेक्षा आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. बी. पवार हे या सर्वांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या आराेग्य केंद्रात डॉक्टर रुजू

धारूरला तालुका आरोग्याधिकारी म्हणून डॉ. शहाजी लोमटे रुजू झाले आहेत. ताडसोन्ना आरोग्य केंद्रात डॉ. प्रीतम लोध, डॉ. अमित जाधव, डॉ. बलराज राठोड - निपाणी जवळका, डॉ. शीतल पाटील - उमापूर, डॉ. देवश्री फाजगे - अंमळनेर, डॉ. मंजूश्री दुल्लरवार - कुप्पा, डॉ. स्वप्नाली वाघमारे - गंगामसला, डॉ. सोनाली कांबळे - बनसारोळा, डॉ. कृष्णा पवार व डॉ. प्रणिता मुंडे - रुई धारूर, डॉ. अविनाश गोले - किट्टी आडगाव, डॉ. अभिजित अंजान - बर्दापूर, डॉ. योगिता पल्लेवाड - मोहखेड, डॉ. आमेल मलिक अझीज शेख - मोहा, डॉ. ऋषिकेश जोगदंड - चकलांबा, डॉ. तय्यबा फातिमा इकबाल - चकलांबा, डॉ. केशव सारूक - युसूफवडगाव, डॉ. संध्या लाड - टाकळसिंग, डॉ. आनंद चौधरी - शिरूर कासार, डॉ. चैतन्य कागदे - येळंबघाट हे रुजू झाले आहेत.

---

आतापर्यंत धारूर तालुका आरोग्याधिकारी व विविध आरोग्य केंद्रांत २० वैद्यकीय अधिकारी रुजू झाले आहेत. हे रुजू झाल्याने कामाची गती नक्कीच वाढेल. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना केल्या जातील.

- डॉ. जयवंत मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी, बीड

Web Title: Relief to the health department; Apply 20 MO with one THO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.