पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा; हातची पिके गेली पण पिण्याच्या पाणीसाठ्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 06:31 PM2023-09-23T18:31:44+5:302023-09-23T18:32:24+5:30

बीडसांगवी गावच्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

Relief to farmers as rains return; Hand crops are gone but there is hope of drinking water supply | पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा; हातची पिके गेली पण पिण्याच्या पाणीसाठ्याची आशा

पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा; हातची पिके गेली पण पिण्याच्या पाणीसाठ्याची आशा

googlenewsNext

-  नितीन कांबळे 
कडा ( बीड) : पावसाने दोन दिवसांपासून तालुक्यातील ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. अनेक दिवसानंतर समाधानकाक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पिके हातची गेली असली तरी आता पिण्यासाठी पाणीसाठा चांगला होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आष्टी तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने आखाडते घेतल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला होता. पाण्या अभावी पिके हातची गेली. बाजरी, तुर, कपाशी पिकानी तग धरला. पण आता परतीच्या पावसाने कडा, दादेगांव, डोंगरगण, घाटापिंपरी,धामणगांव, देवळाली, बीडसांगवी, बावी, धानोरा,लोणी सय्यदमीर, अंभोरा,जळगांव,मांडवा, यासह तालुक्यात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. 

पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागुन पाणीसाठा चांगला होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. बीडसांगवी गावच्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

Web Title: Relief to farmers as rains return; Hand crops are gone but there is hope of drinking water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.