माजलगावच्या गुणवत्ता विकासात राजस्थानी विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी - आर. जी. बजाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:32 AM2021-07-29T04:32:49+5:302021-07-29T04:32:49+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा राजस्थानी माध्यमिक विद्यालयात आयोजित केला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावर्षी विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, पायल गिल्डा ९९.६०, समृद्धी खेडकर ९८.८०, गणेश लांबुड ९८.८०, तनुज बाहेती ९६.८०, अंजली लाटे ९५.८०, ईश्वरी काळे ९५.८०, प्रगती थावरे ९३.४०, परितोषा हिरवे ९२.८०, गायत्री नाईकनवरे ९२.४०, बालाजी कापसे ९२.००, ऋषिकेश नागरगोजे ९०.४० अशा एकूण अकरा विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.
ते म्हणाले की, सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी कठोर परिश्रमाने विद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख चढता ठेवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. विद्यालयाच्या शिक्षिका रेणुका कांकर यांना उत्कृष्ट कार्याबद्दल लीप ऑफ वर्डच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कौतुक सोहळ्यासाठी सचिव रामानंद लड्डा, संचालक रमेशचंद्र कासट, डॉ. दत्तप्रसाद इंदानी, मुख्याध्यापक चंद्रशेखर तौर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रंसगी संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक चंद्रशेखर तौर यांचा अध्यक्ष डॉ. आर. जी. बजाज, सचिव रामानंद लड्डा, संचालक, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल मस्के यांनी केले. सारिका खेडकर व जया पवार यांनी सूत्रसंचालन केले. केले. उपस्थितांचे आभार अमृता चौकीदार यांनी मानले.