रेमडेसिवीर संपले; प्रशासन झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:56+5:302021-04-08T04:33:56+5:30

बीड : कोरोनाबाधितांवर उपचारात रेमडेसिवीर इंजेक्शनचा डोस महत्त्वाचा समजला जातो; परंतु बुधवारी जिल्ह्यातील हा साठा पूर्णपणे संपला होता. खाजगी ...

Remedesivir ended; Administration asleep | रेमडेसिवीर संपले; प्रशासन झोपेत

रेमडेसिवीर संपले; प्रशासन झोपेत

Next

बीड : कोरोनाबाधितांवर उपचारात रेमडेसिवीर इंजेक्शनचा डोस महत्त्वाचा समजला जातो; परंतु बुधवारी जिल्ह्यातील हा साठा पूर्णपणे संपला होता. खाजगी रुग्णालयांसह सामान्य नागरिक हे इंजेक्शन मिळविण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये धावाधव करीत असल्याचे सांगण्यात आले. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. आता सामान्यांनी वाचायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच गंभीर रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनसह फॅबीफ्लू गोळ्या दिल्या जात आहेत. सध्या तरी कोरोनावर जास्त प्रमाणात रेमडेसिवीरचा वापर होत आहे; परंतु वाढत्या मागणीमुळे जिल्ह्यातील हा साठा बुधवारी संपला होता. त्यामुळे शासकीय रुग्णालयातच नव्हे, तर खाजगीत उपचार घेणाऱ्यांना परजिल्ह्यात हे इंजेक्शन मिळतेय का? याचा शोध घ्यावा लागला, तसेच काही खाजगी रुग्णालयांनी ढिसाळ प्रशासनावर अवलंबून न राहता पुणे, मुंबई, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून हे इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तरी या इंजेक्शनसाठी सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करावा, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

काळ्या बाजारात ७ हजाराला इंजेक्शन

सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असल्याने काळ्या बाजारात याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासकीय दरानुसार १,४०० रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन काळ्या बाजारात ७ हजार रुपयांपर्यंत विकले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. एका खाजगी रुग्णालयात एका रुग्णाने हे इंजेक्शन खरेदी केले होते.

कोविड सेंटरला १० अन् नसलेल्यांना ५० इंजेक्शन

बीडमधील एका खाजगी रुग्णालयात कोविड सेंटरची परवानगी नसतानाही त्यांना ५० इंजेक्शन देण्यात आले, तर जेथे बाधित रुग्ण उपचार घेतात, त्यांना केवळ १० इंजेक्शन दिले. हा प्रकार सोमवारी रात्री १० वाजता एका एजन्सीवर घडल्याचे सूत्रांनी सांगितले. १,४०० रुपयांचे इंजेक्शन १,४६८ रुपयांना दिल्याचेही सांगण्यात आले. यावरून वितरणातही मोठा घोळ केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रशासन करतेय काय?

कोरोनामुळे रोज ५ ते १० लाेकांचा जीव जात आहे. इकडे एकाच सरणावर ८ लाेकांचा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. इंजेक्शनसह औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने सामान्यांचा जीव धोक्यात आला आहे. कोरोनावर उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोट

जिल्ह्यातील सहा होलसेलर्सकडे स्टॉक नव्हता. इतर ठिकाणी ३५० रेमडेसिवीर उपलब्ध होते. आणखी ३ हजार इंजेक्शनची मागणी केली आहे.

-रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड

--

रोज अंदाजे मागणी - ४०० ते ६०० इंजेक्शन

बुधवारी उपलब्ध साठा - ३५०

एका इंजेक्शनची शासकीय किंमत - १,४०० रुपये

Web Title: Remedesivir ended; Administration asleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.