रेमडेसिविर इंजेक्शन; कार्यालयातील लोक आता 'सीएस'च्या घरापर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:00+5:302021-04-20T04:35:00+5:30

बीड : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. इंजेक्शन मिळावे यासाठी ...

Remedivir injection; People in the office now reached CS's house | रेमडेसिविर इंजेक्शन; कार्यालयातील लोक आता 'सीएस'च्या घरापर्यंत पोहोचले

रेमडेसिविर इंजेक्शन; कार्यालयातील लोक आता 'सीएस'च्या घरापर्यंत पोहोचले

Next

बीड : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. इंजेक्शन मिळावे यासाठी कालपर्यंत सीएसच्या कार्यालयापर्यंत गेलेले नातेवाईक सोमवारी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले होते. आता नागरिकांची सहनशीलता संपत असून, ते आता घरात घुसण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, नेते आणि लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देऊन सामान्यांच्या भावनांनाच 'इंजेक्शन' देत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचा विषय बनत आहे. त्यातच बाधित रुग्णांवर प्रभावी समजल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना हे इंजेक्शन मिळतच नाही. खासगी डॉक्टर एक चिठ्ठी नातेवाइकांच्या हातावर टेकवून जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखवत आहेत. मागील चार दिवसांपासून नातेवाईक जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत, तर काही लोक पहाटेपासूनच प्रशिक्षण केंद्रात हजेरी लावून मध्यरात्री उशिरापर्यंत थांबत आहेत. परंतु तरीही त्यांना इंजेक्शन मिळत नाही, तर अधिकारीही नागरिकांना उत्तरे देण्याऐवजी तोंड लपवून बसत आहेत.

दरम्यान, रविवारपर्यंत कार्यालय व प्रशिक्षण केंद्रात वाट पाहणारे नातेवाईक सोमवारी दुपारी घरापर्यंत पोहोचले होते. येथे डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि पुन्हा घरात परतले. इंजेक्शन मात्र मिळाले नाही. आता नागरिकांची सहनशीलता संपत असून, सोमवारी घरापर्यंत पोहोचलेले लाेक आता अधिकाऱ्यांच्या घरात जाण्याच्या तयारीत आहेत. असे असले तरी त्यांची मागणी पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे.

नेत्यांविरोधात तीव्र रोष

मागील आठवड्यापासून सर्वत्रच इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. लोकप्रतिनिधी आणि नेते आम्ही एवढे इंजेक्शन दिले, तेवढ्यांसाठी फोन केला, एवढ्यांची मागणी केली, अशी आश्वासने देऊन सामान्यांच्या जखमेवर मीठ चाेळत आहेत. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १०० इंजेक्शन मिळाली असून, रेमडेसिविरबाबत पुढाऱ्यांचे दावे, आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे आश्वासनांचा फुसका बार उडविणाऱ्या नेत्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.

दोन दिवसांत २८९ अर्ज

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आरोग्य विभागाने अर्ज जमा केले आहेत. शनिवारी १६८, तर रविवारी १२१ अर्ज प्राप्त झाले होते. सोमवारीही तेवढेच लोक प्रशिक्षण केंद्राबाहेर होते. दोन दिवसांत २८९ अर्ज आले होते, परंतु एकालाही इंजेक्शन मिळाले नव्हते. सोमवारच्या अर्जाचा आकडा उशिरा येईल, असे डॉ. गित्ते म्हणाले.

कोट

जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्यांसाठी फक्त इंजेक्शन आहेत. खासगीमधील लोकांसाठी एकही शिल्लक नाही. आतापर्यंत केवळ १०० इंजेक्शन परळीहून आली असून, ती देखील संपली आहेत. इतर एकही इंजेक्शन मिळाले नाही. लोक रांगा लावतात, त्यांना त्रास होत आहे हे मला पण पाहू वाटत नाही; पण साठाच नाही तर मी काय करणार? आलेल्या लोकांचे अर्ज घेतले असून, इंजेक्शन आल्यास संपर्क करून ते दिले जातील.

डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

कोट

जिल्हा रुग्णालयातील इंजेक्शनची माहिती माझ्याकडे नाही. जिल्ह्यात सध्या १२ इंजेक्शन आहेत. मागील पाच दिवसांत साधारण हजार इंजेक्शन आली होती. त्यातील ७०० जिल्हा रुग्णालयाला दिली, तर ३०० सामान्य लोकांना दिली. आपण १५ हजार इंजेक्शनची मागणी केलेली आहे.

रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड

===Photopath===

190421\19_2_bed_7_19042021_14.jpeg~190421\19_2_bed_6_19042021_14.jpeg

===Caption===

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या घराबाहेर प्रतिक्षेत असलेले नातेवाईक. आतमध्ये पोलीस कर्मचारीही बंदोस्ताला होता.~प्रशिक्षण केंद्रासमोर इंजेक्शनसाठी आलेले नातेवाईक येथेच बसून जेवण करतात. तर काही लोक उपाशीपोटीच प्रतिक्षा करीत आहेत.

Web Title: Remedivir injection; People in the office now reached CS's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.