गॅस सिलेंडरची काढली अंत्ययात्रा; इंधन दरवाढीच्या विरोधात परळीत शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:33 PM2021-02-05T17:33:20+5:302021-02-05T17:34:09+5:30
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने देशातील नागरिक त्रस्त आहेत. केंद्र सरकार यावर काही उपयायोजना करत नसल्याने महागाई वाढली असल्याचा आंदोलकांचा आरोप.
परळी- इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी गॅस सिलेंडरची तिरडीवर अंत्ययात्रा काढून इंधन दरवाढी विरोधात संताप व्यक्त केला.
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने देशातील नागरिक त्रस्त आहेत. केंद्र सरकार यावर काही उपयायोजना करत नसल्याने महागाई वाढली असल्याचा आंदोलकांनी आरोप केला. याचा निषेध करत संतप्त शिवसेना आंदोलकांनी गॅस सिलेंडर तिरडीवर ठेवत यात्रा काढली. तसेच आंदोलकांनी बैलगाडीत मोटार सायकल ठेऊन आंदोलन केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आंदोलकांनी इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनास शहरातील मध्यवर्ती राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून सुरुवात झाली. पुढे मोंढा मार्केट, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर आंदोलक धडकले. आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यानंतरही इंधन दर वाढत गेले तर शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
आंदोलनासाठी उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, भविसे जिल्हा संघटक अतुल दुबे, जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे, विधानसभा संघटक राजा भैया पांडे, तालुका सचिव रामराव माने, सतीश अण्णा जगताप, युवा सेना तालुका समन्वयक संतोष चौधरी, उप शहर प्रमुख मोहन राजमाने, किशन बुंदेले, भविसे उपजिल्हा संघटक मोहन परदेशी, युवासेना शहर प्रमुख कृष्णा सुरवसे, शहर समन्वयक सुदर्शन यादव, तुकाराम अप्पा नरवाडे, शहर संघटक अनिल शिंदे, अश्रूबा काळे, गजानन कोकीळ, बाबा सोनवणे, युवक नेते विशाल देशमुख, कैलास कावरे, अतुल शिंदे, संपत शिंदे, नितीन जाधव, नागेश मुरकुटे, उमेश सोळंके, महेश सोनवणे, वैजनाथ सलगर, विष्णू सलगर, नागनाथ सलगर, , विश्वनाथ पंजरकर, अजय आवड, बबन ढेमरे, नवनाथ सरवदे, विशाल गावडे, भास्कर पाटील, विशाल शिंदे आदींनी प्रयत्न केले.