विद्युत उपकरणाची दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:47+5:302021-04-13T04:31:47+5:30
सालगड्याची वानवा, सालाच्या रकमेत वाढ शिरूर कासार : कितीही यांत्रिकीकरण झाले असले तरी शेतात काम ...
सालगड्याची वानवा, सालाच्या रकमेत वाढ
शिरूर कासार : कितीही यांत्रिकीकरण झाले असले तरी शेतात काम करण्यासाठी मजूर हा अविभाज्य भाग असतो. रोजंदारीत किमान दीडपट दोनपट वाढ झाली तर सालगडी म्हणून बारा महिन्यांचा ठराव केला जातो. त्याची वार्षिक रक्कम ठरवली जाते. सालगड्याचेही महत्त्व वाढले असल्याने अनायासे त्याच्या सालाच्या रकमेतदेखील जवळपास दीडपट वाढीची मागणी होत आहे. शेतकरी शेतीत उत्पादन घेतो त्यापेक्षा अधिक खर्च हा मजुरीवर व सालगड्यावर होत असल्याने शेती व्यवसाय देखील भांडवली होत आहे.
सोन्याच्या पेठेला कोरोनाची काजळी
शिरूर कासार : तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर सोने चांदीचे अलंकार बनवणे व विक्रीची मोठी दुकाने आहेत. शहरातील नगरपंचायत ते गांधी चौक सोन्याची पेठ मानली जाते. मात्र, या सोन्याच्या पेठेवर देखील कोरोनाची काजळी आली असून लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद दिसून येतात. गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यादिवशी ऐपतीप्रमाणे सोन्याचे किडूक मिडूक खरेदी करण्याकडे कल असतो. मात्र आता दुकाने बंद असल्याने खरेदीला आवर घालावा लागत आहे.