हातपंप दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:55+5:302021-03-15T04:29:55+5:30
शेतीला पाणी मिळेना बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला ...
शेतीला पाणी मिळेना
बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतीला पाणी देण्याचे हे दिवस असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.
फांद्यामुळे अपघात
वडवणी : ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बाभळी व इतर झाडांच्या फांद्या वाढल्यामुळे वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. फांद्या छटाई करण्याची मागणी होत आहे.
साहित्य रस्त्यावरच
बीड : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासीयांना ये-जा करताना याचा त्रास सहन करावा लागून वाहतुकीस अडथळा होत आहे.
पर्यावरणाला धोका
वडवणी : शहर आणि परिसरात वृक्षतोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधितांसह दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.