रस्तादुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:28+5:302021-01-20T04:33:28+5:30

दारू विक्री बंद करा आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. ते घडू ...

Repair the road | रस्तादुरुस्ती करा

रस्तादुरुस्ती करा

Next

दारू विक्री बंद करा

आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. ते घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहेे परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शेतीला पाणी मिळेना

बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागांत विजेचा लपंडाव सुरू आहे. ‘महावितरण’कडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतीला पाणी देण्याचे हे दिवस असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.

साहित्य रस्त्यावरच

अंबाजोगाई : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकामाचे साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासीयांना ये-जा करताना याचा त्रास सहन करावा लागतो.

अवैध वाळू वाहतूक

गेवराई : शहरासह परिसरामध्ये आजही पोलीस व महसूल विभागाची नजर चुकवून वाळूमाफिया दुप्पट दर आकारत अनधिकृतपणे वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसत आहे.

सेवा मिळत नसल्याने मोबाईलधारक हैराण

बीड : बीड शहर व परिसरातील ग्रामीण भागात बी.एस.एन.एल.ची मोबाईल सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. समोरच्या व्यक्तीला फोन लावला तरी रेंज उपलब्ध नसते. जर रेंज उपलब्ध असेल तर ती व्यक्ती आऊट ऑफ कव्हरेज एरिया असे सांगितले जाते. अशी स्थिती इंटरनेट कनेक्शनबाबतीतही झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करतांना मोबाईलमध्ये रेंज दिसते. मात्र, कामकाज होत नाही. अशा स्थितीमुळे मोबाईलधारक हैराण झाले आहेत.

अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

माजलगाव : शहरातील बसस्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारतींना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर हातगाड्यांची गर्दी असते. याबाबत येथील नागरिक तक्रारी करीत आहेत; परंतु याकडे अद्यापही संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे.

Web Title: Repair the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.