लघु प्रकल्पांची दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:45+5:302021-04-19T04:30:45+5:30

अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघु प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अनेक छोटी ...

Repair of small projects stalled | लघु प्रकल्पांची दुरुस्ती रखडली

लघु प्रकल्पांची दुरुस्ती रखडली

Next

अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघु प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अनेक छोटी व मोठी कामे या माध्यमातून व्हावीत. अनेक प्रकल्पांना गेट बसविणे, गेटची दुरुस्ती अशा कामांसाठी निधींची मागणी करण्यात आली; मात्र निधीची अडचण, तसेच कोरोना परिस्थितीमुळे दुरुस्तीची कामे रखडली आहेत.

आठ दिवसांआड पाणीपुरवठा

अंबाजोगाई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तरीही अंबाजोगाई शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याने वेळी-अवेळी केव्हाही पाणी सोडले जाते. कोणत्याच प्रभागाचा पाणी सोडण्याचा दिवस ठरलेला नसल्याने मनमानी पाणी सोडले जाते. मुबलक पाणीसाठा असूनही आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वीज बिलाचा ग्राहकांना शॉक

माजलगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणकडून अव्वाच्या सव्वा प्रमाणात बिले देण्यात आली आहेत. कोणत्याही विद्युत पंपाला मीटर नसल्याने देण्यात येणारी बिले अंदाजाने देण्यात येतात. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कमी हॉर्सपावरच्या विद्युत मोटारी आहेत अशा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात वीज बिले आली आहेत. महावितरणच्या या वीज बिलाच्या शॉकने वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे, तर वीज कंपनीने वसुली सुरू ठेवली आहे.

अवैध वृक्षतोड थांबविण्याची मागणी

अंबाजोगाई : शहरालगत आद्य कवी मुकुंदराज स्वामी परिसर, संतकवी दासोपंत स्वामी परिसर, रेणुकादेवी परिसर, नागनाथ परिसर या परिसरात वनविभागाची वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे. शहरापासून दूर असलेल्या या परिसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. हा परिसर वृक्षांनी चांगला बहरलेला असताना वेळीच वनविभागाने या परिसरातील अवैध वृक्षतोड थांबवून हा परिसर योग्य स्थितीत ठेवावा, अशी मागणी आहे. परंतु अद्यापही याकडे गांभीर्याने लक्ष न देता वृक्षतोड सुरूच आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.

लघु प्रकल्पांची दुरुस्ती रखडली

अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघु प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अनेक छोटी व मोठी कामे या माध्यमातून व्हावीत. अनेक प्रकल्पांना गेट बसविणे, गेटची दुरुस्ती अशा कामांसाठी निधींची मागणी करण्यात आली; मात्र निधीची अडचण, तसेच कोरोना परिस्थितीमुळे दुरुस्तीची कामे रखडली आहेत.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची

अंबाजोगाई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तरीही अंबाजोगाई शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याने वेळी-अवेळी केव्हाही पाणी सोडले जाते. कोणत्याच प्रभागाचा पाणी सोडण्याचा दिवस ठरलेला नसल्याने मनमानी पाणी सोडले जाते. मुबलक पाणीसाठा असूनही आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Web Title: Repair of small projects stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.