त्या मद्यपी कर्मचाऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:29 AM2021-01-17T04:29:11+5:302021-01-17T04:29:11+5:30
तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींची शुक्रवारी निवडणूक झाली. मोगरा गावच्या मतदान केंद्रावर नियुक्त असलेले कर्मचारी गुरुवारी सायंकाळी गावात मतदान साहित्यासह ...
तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींची शुक्रवारी निवडणूक झाली. मोगरा गावच्या मतदान केंद्रावर नियुक्त असलेले कर्मचारी गुरुवारी सायंकाळी गावात मतदान साहित्यासह पोहोचले. त्या ठिकाणी ते मद्यपान करीत असताना त्यांना निवडणुकीतील उमेदवार आणि गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या ठिकाणी मतदान कर्मचारी म्हणून बाबासाहेब इंगोले, प्रमोद कोल्हे, रामदास इसानकर व पोलीस संतोष सरवदे यांची नियुक्ती होती. गावकऱ्यांनी ही माहिती व्हिडीओ क्लिपसह निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार वैशाली पाटील यांच्यापर्यंत पाठविली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना तेथून बदलून राखीव कर्मचाऱ्यांना नियुक्त केले. या घटनेची तहसीलदार पाटील यांनी गंभीर दखल घेतली. या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याबद्दलचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.