आष्टीत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सहा वासरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2024 12:06 PM2024-01-06T12:06:42+5:302024-01-06T12:08:21+5:30
सहा वासरांची सुटका करत एकावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन कांबळे, कडा (जि.बीड) - विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंश प्राण्याची कत्तल करण्यासाठी चारापाण्याची कसलीच व्यवस्था न करता डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांनी मिळताच शनिवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान सहा वासरांची सुटका करत एकावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी शहरातील कुरेशी गल्लीतील आशिफ गुलामगौस कुरेशी यानी स्वताच्या फायद्यासाठी शेडमध्ये गावरान गाईचे दोन व जर्सी गाईचे चार असे एकूण सहा वासरे विनापरवाना बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी वासरे डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना समजाताच त्यानी शनिवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान धाड टाकुन १२हजार रूपये किमतीचे सहा वासरे ताब्यात घेतले. पोलिस हवालदार अनिल सुंबरे याच्या फिर्यादीवरून आरोपी आसिफ कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.आरोपी पसार झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे करीत आहेत.
ही कारवाई आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस याच्या मार्गदर्शनाखाली , पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, पोलिस हवालदार अनिल सुंबरे,पोलीस नाईक गुजर,मुंडे, पोलीस शिपाई राऊत यांनी केली.
ती वासरे कर्जतच्या गोशाळेत!
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रूक्मिणीमाता येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहेत.