जिल्ह्यातील पंचायत समित्यांची निवासस्थाने होणार सुसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:29 AM2021-04-03T04:29:56+5:302021-04-03T04:29:56+5:30

पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज अंबाजोगाई व परळीचा समावेश बीड : जिल्ह्यातील पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज अंबाजोगाई व परळी या ...

The residences of Panchayat Samiti in the district will be equipped | जिल्ह्यातील पंचायत समित्यांची निवासस्थाने होणार सुसज्ज

जिल्ह्यातील पंचायत समित्यांची निवासस्थाने होणार सुसज्ज

googlenewsNext

पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज अंबाजोगाई व परळीचा समावेश

बीड : जिल्ह्यातील पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज अंबाजोगाई व परळी या पंचायत समित्यांच्या निवासी इमारतींचे रुपडे पालटणार असून, सभापती, अधिकारी-कर्मचारी तसेच निवासी इमारतींच्या बांधकाम व उपकामांसाठी २ कोटी ८५ लाख रुपये निधी ग्रामविकास विभागामार्फत मंजूर करून जिल्हा प्रशासनास वितरित करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विविध रखडलेली कामे व नावीन्यपूर्ण विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पातून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवासी इमारतींच्या बांधकामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीमधून सदर कामांना मंजुरी देण्यात आली असून, सदर निधी वितरणाचा शासन आदेश बीड जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. या अंतर्गत पाटोदा पंचायत समितीस ४५ लाख, गेवराई ७० लाख, केज ५० लाख, अंबाजोगाई ३० लाख तर परळी व माजलगाव पंचायत समितीस प्रत्येकी ४५ लाख रुपये सभापती, अधिकारी- कर्मचारी निवासस्थाने बांधकाम व उपकामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी बीड जिल्हावासीयांना उद्देशून केलेल्या भाषणातून कोविड विषयीचे आर्थिक निर्बंध जसजसे कमी होतील तसतसे जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यासह, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक कामे हाती घेतली जातील, असे आश्वासन जिल्हावासीयांना दिले होते.

त्यानुसार धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील रुग्णालये, न्यायालये आदी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील ६ पंचायत समित्यांच्या निवासी इमारतींच्या बांधकामांसाठी २ कोटी ८५ लाख रुपये निधी प्राप्त झाल्याने या इमारतींचे रुपडे आता पालटणार आहे.

===Photopath===

020421\022_bed_4_02042021_14.jpg

===Caption===

धनंजय मुंडे

Web Title: The residences of Panchayat Samiti in the district will be equipped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.