आष्टी, पाटोद्याच्या नगराध्यक्षांचा राजीनामा, आता नवे अध्यक्ष कोण? दोघींनीही १५ महिने केले काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 10:12 PM2023-07-10T22:12:14+5:302023-07-10T22:12:33+5:30

आता नवीन नगराध्यक्ष कोण? याकडे लक्ष लागले आहे.

Resignation of Ashti, Patodaya mayor, now who is the new president Both worked for 15 months | आष्टी, पाटोद्याच्या नगराध्यक्षांचा राजीनामा, आता नवे अध्यक्ष कोण? दोघींनीही १५ महिने केले काम

आष्टी, पाटोद्याच्या नगराध्यक्षांचा राजीनामा, आता नवे अध्यक्ष कोण? दोघींनीही १५ महिने केले काम

googlenewsNext


बीड : आष्टी, पाटोदा येथील महिला नगराध्यक्षांनी सोमवारी एकाच वेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला. दोघींनीही दीड वर्षे काम केले. आता पुढील दीड वर्ष नवख्यांना संधी दिली जाणार आहे. या दोन्ही नगर पंचायत भाजपचे आ. सुरेश धस यांच्या ताब्यात आहेत. आता नवीन नगराध्यक्ष कोण? याकडे लक्ष लागले आहे.

पाटोदा शहराच्या नगराध्यक्षा सय्यद खतीजाबी सय्यद अमर या असून आष्टीच्या पल्लवी स्वप्नील धोंडे या आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी भाजप आ. सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब आजबे गटात लढत झाली होती. परंतु दोन्हीही ठिकाणी आ.धस गटाने गुलाल उधळला होता. त्यानंतर पाटोदा येथे सर्वानुमते सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची तर आष्टीत पल्लवी धाेंडे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. 

आता या दोघींनीही सोमवारी राजीनामा दिला आहे. त्यात जरी वैयक्तिक कारण दिले असले तरी राजकीय शब्द पाळण्यासाठी हे केल्याचे सांगण्यात येत आहे. आता नवीन नगराध्यक्ष कधी निवडणार आणि कोण होणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आष्टी व पाटोदा येथील नगराध्यक्षांचे राजीनामे आल्याचे सांगितले.

Web Title: Resignation of Ashti, Patodaya mayor, now who is the new president Both worked for 15 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.