राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव स्वच्छतेचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:31 AM2021-02-07T04:31:13+5:302021-02-07T04:31:13+5:30
गेवराई : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त धोंडराई गावातील समाजसेवक जगन्नाथ घोडके यांनी संपूर्ण धोंडराई गाव स्वच्छ ...
गेवराई : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त धोंडराई गावातील समाजसेवक जगन्नाथ घोडके यांनी संपूर्ण धोंडराई गाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. घोडके गेल्या अनेक वर्षांपासून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी तसेच महापुरुषांची जयंती-पुण्यतिथीनिमित्त गावातील बसस्थानक, शालेय परिसर स्वयंस्फूर्तीने स्वच्छ करतात. तसेच गावातील विविध उपक्रमांत सेवा देण्यासाठी कायम तत्पर असतात. यावर्षी त्यांनी २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १ ते २३ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण धोंडराई गाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांनी गावात स्वच्छतेला सुरूवात केली आहे. यावेळी ह. भ. प. रामदास महाराज, संत निरंकारी मंडळ, गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने जगन्नाथ घोडके यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास महाराजांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रकाश खरात यांनी केले तसेच प्रास्ताविक धर्मराज करपे यांनी केले. यावेळी सरपंच अशोक वंजारे, भागवत ढेंबरे, गौरव खरात, अनिल रावडे, संत निरंकारी मंडळाचे विष्णूपंत काकडे, जगू सवासे, जायगुडे, डुचे, भागवत मेघारे, शिवाजी भोसले, हनुमंत निकम, दत्ता शेटे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, धोंडराईचे शिक्षक तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.