सेवानिवृत्तीनंतर गावविकासाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:40+5:302021-02-15T04:29:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शासकीय - निमशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भूमीपुत्र या नात्याने जबाबदारीचे भान ठेवत यापुढे गाव ...

Resolution for village development after retirement | सेवानिवृत्तीनंतर गावविकासाचा संकल्प

सेवानिवृत्तीनंतर गावविकासाचा संकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : शासकीय - निमशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भूमीपुत्र या नात्याने जबाबदारीचे भान ठेवत यापुढे गाव विकासासाठी झटण्याचा संकल्प राज्य परिवहन महामंडळातील वाहतूक नियंत्रक, राष्ट्रीय कबड्डीपटू तथा मॅक बँकेचे संचालक श्रीमंत उबाळे आणि पाटोदा येथील कृषी पर्यवेक्षक अरूण उबाळे यांनी केला आहे.

या दोघांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बीड पंचायत समितीचे उपसभापती मकरंद उबाळे, बीड जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बळीराम उबाळे, ब्रम्हदेव शेळके, अभिमन्यू उबाळे, देवीदास उबाळे, भारत उबाळे, रोजगार सेवक शहादेव उबाळे, माणिक उबाळे, बबन उबाळे आदी उपस्थित होते. बळीराम उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. चऱ्हाटा येथील कबड्डीची चार मैदाने बंद पडली आहेत. तेथे लवकरच कबड्डी खेळ पूर्ववत सुरू करण्यात येईल. चऱ्हाटा गावातून पुन्हा विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय कबड्डीपटू निर्माण करण्याचे काम करणार असल्याचे श्रीमंत उबाळे म्हणाले. कृषी पर्यवेक्षक अरुण उबाळे यांनी चऱ्हाट्यामध्ये ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आदी कृषिविषयक योजना राबविण्यासाठी गावातील लोकांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Web Title: Resolution for village development after retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.