घाटनांदूरमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:19+5:302021-04-19T04:30:19+5:30
घाटनांदूर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सर्वच व्यापाऱ्यांनी आपापली आस्थापना बंद ठेवले होते. तर रस्ते निर्मनुष्य झाले ...
घाटनांदूर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सर्वच व्यापाऱ्यांनी आपापली आस्थापना बंद ठेवले होते. तर रस्ते निर्मनुष्य झाले होते. अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके व तहसीलदार विपीन पाटील यांनी शनिवार, रविवार असा दोन दिवस वीकेंड कर्फ्यू लागू करून सर्वच व्यवहार व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला संपूर्ण तालुक्यासह घाटनांदूर व परिसरातील सर्वच गावांतून शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाचे आवाहन व नागरिकांचा प्रतिसाद यामुळे वीकेंड कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. पोलीस प्रशासनही आपली भूमिका चोख पार पाडत असून विनाकारण बाहेर फिरणारे, विनामास्क फिरणारे यांना चोप देण्याची भूमिका पोलीस घेत असल्याची माहिती येथील पोलीस जमादार उद्धव सावंत, जमादार अनिल बिक्कड यांनी दिली. प्रशासनाला सहकार्य करून निर्बंध पाळले तर निश्चितपणे आपण कोरोनावर मात करू, असे उपजिल्हाधिकारी शरद झाडके व तहसीलदार विपीन पाटील यांनी सांगितले.