पल्स पोलिओ मोहिमेला प्रतिसाद, आजपासून गृहभेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:53 PM2019-03-10T23:53:15+5:302019-03-10T23:53:54+5:30

जिल्हा रुग्णालयात १० मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आरोग्य सेवा लातूरचे उप संचालक डॉ. एकनाथ माले, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

Responding to the Pulse Polio campaign, homecoming from today | पल्स पोलिओ मोहिमेला प्रतिसाद, आजपासून गृहभेटी

पल्स पोलिओ मोहिमेला प्रतिसाद, आजपासून गृहभेटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात १० मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आरोग्य सेवा लातूरचे उप संचालक डॉ. एकनाथ माले, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. येडगे दाम्पत्याने स्वत:च्या बाळाला पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेला सुरुवात केली. यानंतर डॉ. माले यांनी मोहिमेतील लाभार्थ्यांना पोलिओचे दोन थेंब लस पाजून लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, डॉ. आय. व्ही. शिंदे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संजय कदम, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल बारकूल, डॉ. अनुराग पांगरीकर, डॉ. ओस्तवाल यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Responding to the Pulse Polio campaign, homecoming from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.